रोड रोमिओच्या कारनाम्याचा कुडाळ पोलिसांच्या टीम कडून धाडसी पर्दापाश

0

कुडाळ | प्रतिनिधी 

रोड रोमिओच्या कारनाम्याचा कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आणि त्यांच्या टीमने धाडसी पर्दापाश केला. पुसटशच्या पुराव्याच्या आधारे. त्या रोड रोमियो पर्यंत पोहोचण्याचे कसब कुडाळ पोलिसांच्या टीमने करून दाखवले आणि संबंधिताला त्रासापासून वाचवले कुडाळ पोलिसांच्या या तपासाच्या कार्यपद्धतीबाबत कौतुक होत आहे.

परिसरात एका रस्त्यावर संबंधित व्यक्तीला त्या रोड रोमियो कडून त्रास दिला जात होता त्यामुळे अक्षरशः हैराण झालेल्या. त्या व्यक्तीने राहत असलेल्या परिसरातील सजग नागरिकांच्या कानावर ही बाब घातली सविस्तर माहिती घेतल्यावर संबंधित नागरिकांनी कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या कानावर हा प्रसंग घातला मगदूम यांनी याचा सविस्तर अभ्यास करून तपासाची चक्रे आपल्या टीमच्या अधिकाऱ्यांमार्फत फिरवली या प्रकरणात कोणताही भक्कम असा पुरावा नव्हता मात्र पुरावा होता तो फुसटसा होता. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर तपासाचे आव्हान होते हे आव्हान पोलिसांच्या टीमने पेलण्याचा निर्णय पक्का केला आणि कामाला लागले. तपासाची चक्रेगरागरा फिरवली. घटना घडली ते घटनास्थळ आणि संबंधित तक्रारदाराने सांगितलेली हकीगत याचा ताळमेळ जुळवणे फार मोठे जिकरीचे काम होते. तरी पण मागे हटायचे नाही या घटनेचा छडा लावायचाच या इराद्याने. पेटलेल्या कुडाळ पोलिसांच्या टीमने मोठी जोखीम पत्करीत तपासाची चक्रे फिरवली. मिळालेल्या पुसटच्या पुराव्याच्या आधाराने शोध लावण्यास सुरुवात केली टीम मधील अनेकांचे हात या तपासासाठी सरसावले. अखेर यश आले तपास पूर्ण झाला तेव्हा पोलीस अधिकारीही थक्क झाले. संबंधितही चक्रावला पोलीस यंत्रणेकडून संबंधिताला समज देण्यात आली अखेर रोड रोमिओकडून त्रास होत असेल तर निर्भयपणे संबंधित व्यक्तीने पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी केले.