आमदार नितेश राणे यांना कॅबिनेट मंत्रिमंडळ स्थान द्या ;  भा. के. वारंग 

0

कुडाळ | प्रतिनिधी 

आमदार नितेश राणे यांना कॅबिनेट मंत्रिमंडळात स्थान द्यावे अशी मागणी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तुळसुली विकास सोसायटीचे चेअरमन सहकारातील ज्येष्ठ नेते भा.के.वारंगयांनी केली आहे त्यांनी मेल केलेल्या पत्रात म्हटले की देशाचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळामध्ये कोकणचे सुपुत्र (कै) एस के पाटील हे रेल्वेमंत्री होते त्यावेळेपासून मी सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे तळ कोकणात प्रथमच चाळीस वर्षानंतर लोकसभेचे विद्यमान खासदार माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या रूपाने तळ कोकणात कमळ फुलले भाजपची सत्ता आली नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कणकवली मतदारसंघातून आमदार नितेश राणे हे तीन वेळा भरघोस मतांनी निवडून आले आमदार नितेश राणे हे हिंदुत्वाची प्रखरतेनेबाजू मांडत असतात नितेश राणे यांची कॅबिनेट मंत्रीपदी वरली लावावी अशी जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते व तळागाळातील कार्यकर्त्यांची तरुणांची मागणी आहे या मागणीचा विचारपूर्वक विचार व्हावा अशी मागणी त्यांनी मेल द्वारे केली आहे.