नापत्ता झालेली पिंगुळी गुढीपूर येथील महिला तब्बल १४ वर्षानंतर सापडली

0

कुडाळ पोलिसांना आले यश

कुडाळ | प्रतिनिधी 

पिंगुळी गुढीपूर येथील मंगल पांडुरंग राटूळ ही महिला २०१० मध्ये बेपत्ता झाली होती. तब्बल १४ वर्षानंतर ती सापडून आली आहे. यामध्ये कुडाळ पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. या महिलेला त्यांच्या नातेवाईकांजवळ सुपूर्त करण्यात आले आहे. 

पिंगुळी गुढीपूर येथील महिला मंगल पांडुरंग राटूळ ही बेपत्ता झाली त्यावेळी तिचं व ४० होतं. ती आपल्या आई सोबत राहत होती. ती मानसिक दृष्ट्या आजारी असल्यामुळे निघून जाण्याची सवय होती. पण पुन्हा ती घरी येत होती दरम्यान सन २०१० मध्ये ही महिला राहत्या घरातून कोणास काही न सांगता निघून गेली. ती परत आली नाही. त्यामुळे तिचे नातेवाईक गणपत रघुवीर आटक यांनी मंगल राटूळ ही बेपत्ता झाल्याची तक्रार सन २०१६ मध्ये दाखल केली या बेपत्ता झालेल्या महिलेबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जवळ असलेल्या राज्यासह इतर ठिकाणी या महिलेबाबत माहिती पाठवण्यात आली होती. तसेच याबाबत अलीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातूनही पोलिसांनी ही माहिती प्रसारित केली होती. ही माहिती कर्नाटक राज्यातील उडुपी या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित झाली उडुपी येथे असलेल्या विश्वसदामने आश्रमात ही माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी ही महिला उपचार घेत असल्याचे लक्षात आले. या आश्रमामधून कुडाळ पोलीस ठाणे येथे संपर्क साधण्यात आला. तिचे छायाचित्र पाठविण्यात आले. हे छायाचित्र नातेवाईकांना दाखवण्यात आल्यानंतर मंगल राटूळ असल्याचे निश्चित झाले. तिला उडुपीवरून कुडाळ येथे आणण्यात आले व नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. यासाठी कुडाळ पोलिसांनी मोठे प्रयत्न केले होते तब्बल १४ वर्षानंतर नापत्यात झालेली महिला मिळाली नापत्ता महिलेचा शोध घेण्याची कारवाई सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, पोलीस उपअधीक्षक विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या देखरेखीखाली पोलीस हवालदार कृष्णा परुळेकर व कृष्णा केसरकर यांनी केली आहे.