कुडाळ | प्रतिनिधी
पणदूर येथील दादासाहेब तिरोडकर महाविद्यालयातील इयत्ता ११ वी मधील विज्ञान शाखेतील बेपत्ता झालेला हार्दिक शाम करमळकर हा विद्यार्थी कणकवली रेल्वे स्थानक येथे रेल्वे पोलिसांना सापडून आला. यासाठी कुडाळ पोलिसांनी प्रयत्न केले होते. त्याला शोधण्यासाठी मुंबई येथे पथक प्रमाणात केले होते. हा विद्यार्थी कुडाळ पोलिसांनी कणकवली येथे ताब्यात घेतला.
पणदूर येथील महाविद्यालयातील ११ वी मधील विज्ञान शाखेतील विद्यार्थी हार्दिक करमळकर हा नापत्ता झाला होता. याबाबत त्याच्या वडिलांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. हा विद्यार्थी मुंबईला गेला असावा असा संशय कुडाळ पोलिसांना आला होता. त्या दृष्टीने कुडाळ पोलिसांनी उपनिरीक्षक शेगडे व कर्मचाऱ्यांसह पथक मुंबई येथे रवाना केले होते. तसेच रेल्वे पोलीस यांच्याशी संपर्क साधून या विद्यार्थ्यांची माहिती व छायाचित्र पाठवले होते. हा विद्यार्थी दिवा पॅसेंजरने मुंबई येथे गेला होता. आणि त्याच दिवा पॅसेंजरने आज शनिवार ३० नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात परतत असताना कणकवली रेल्वे स्थानक येथे रेल्वे पोलिसांना सापडून आला त्यांनी तात्काळ कुडाळ पोलिसांची संपर्क साधला कुडाळ पोलिस कणकवली येथे जाऊन या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले या विद्यार्थ्याला मुंबईपर्यंत कोणी घेऊन गेले तसेच तो मुंबई येथे का गेला याची चौकशी तपासात होणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.
