फोंडा घाट येथे पेट्रोल वाहतूक करणाऱ्या टँकरने घेतला पेट

0

सिंधुदुर्ग | प्रतिनिधी 

जिल्हा नियंत्रण कक्षास एमएसआरटीएस विभाग सिंधुदुर्ग यांचेकडून प्राप्त माहितीनुसार आज (बुधवार ) संध्याकाळी ६.४५ चे दरम्यान कोल्हापूर ते सिंधुदुर्ग येणारा भारत पेट्रोलियमचा पेट्रोल वाहतूक करणारा टँकरने फोंडा घाट येथे पेट घेतला आहे. अपघातस्थळी अग्निशमन विभाग कुडाळ व कणकवली विभागाचे अग्निशमन बंब रवाना झालेले आहेत. 

कणकवली तहसीलदार यांना सदर बाबत माहिती देण्यात आलेली असून ते देखील घटनास्थळी भेट देण्यासाठी निघालेले आहेत. घटनास्थळी पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित आहेत.