पावशी येथे लोखंडी रॉडने केली मारहाण ; कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

0

कुडाळ | प्रतिनिधी

८०० रुपये दिले नाहीत म्हणून गोविंद जयराम वराडकर यांच्या डोकीवर प्रसाद तवटे यांनी लोखंडी रॉड मारून जखमी केले ही घटना पावशी मिटक्याचीवाडी नाका येथे घडली. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात प्रसाद तवटे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत हकीकत अशी की पावशी तवटे म्हाडेश्वरवाडी येथील गोविंद जयराम वराडकर हे आज (बुधवार) कुडाळ येथे आठवडा बाजारासाठी आले होते बाजार करून ते आपल्या मोटरसायकलने त्यांचा मित्र महेंद्र तवटे याच्यासोबत पुन्हा पावशी येथे आपल्या घरी जात असताना मिटक्याचीवाडी नाका येते प्रसाद तवटे यांनी हात दाखवून त्यांची मोटरसायकल थांबविली. आणि आठशे रुपये मागितले हे आठशे रुपये दिले नाहीत म्हणून लोखंडी रॉड डोकीवर मारला आणि दुखापत करून शिवीगाळ केली जखमी झालेल्या गोविंद वराडकर यांना महेंद्र तवटे यांनी कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात पावशी धरणवाडी येथील प्रसाद तवटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.