Friday, May 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedआमदार निलेश राणेंनी दिलेल्या पत्राला २४ तास उलटले नाही आणि पोलीस यंत्रणेने...

आमदार निलेश राणेंनी दिलेल्या पत्राला २४ तास उलटले नाही आणि पोलीस यंत्रणेने अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करण्याची उचलली पावले

कुडाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी सर्व धर्मीयांची घेतली बैठक 

कायद्याचे उल्लंघन झाल्यास गुन्हा दाखल करणार ; पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम 

 

कुडाळ | प्रतिनिधी 

आमदार निलेश राणे यांनी अनधिकृत भोंग्या संदर्भात दिलेल्या पत्रानुसार कुडाळ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी कुडाळ पोलीस ठाणे येथे सर्व धर्मीयांची बैठक घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने काढलेल्या आदेशाचे पालन झाले नाही तर अनधिकृत भोंगे लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाईल असे या बैठकीत सांगून कोणत्याही प्रकारे ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्या अन्यथा कायद्यानुसार कारवाई करावी लागेल असेही त्यांनी सांगितले.

आमदार निलेश राणे यांनी कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांना अनधिकृत धार्मिक भोंग्यांसंदर्भात कारवाईची मागणी केली होती. ही मागणी केल्याच्या २४ तासाच्या आत पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी कुडाळ पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील सर्व धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी सांगितले की, ध्वनी प्रदूषण होऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेनुसार राज्य शासनाने २०१७ मध्ये आदेश निर्गमित केले होते. या आदेशानुसार कोणत्याही समारंभामध्ये किंवा धार्मिक कार्यक्रमांमध्ये स्पीकर, डीजे, ढोल पथक असेल तर त्याची परवानगी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे. तसेच धार्मिक कार्यक्रमांमध्ये सुद्धा मंदिर, मज्जिदवर किंवा अन्य ठिकाणी स्पीकर लावायचे असेल तर परवानगी घेणे गरजेचे आहे. यापुढे अशा परवानगी घेतल्या गेल्या नाही आणि शासनाने ठरवलेल्या आवाजाच्या मर्यादेबाहेर स्पीकर आवाज असेल तर गुन्हा दाखल केला जाईल. त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा दाखल होईल असे त्यांनी सांगितले. तसेच कायमस्वरूपी ज्यांचे स्पीकर मंदिर, मज्जीदीवर आहेत. त्यांनी दर तीन महिन्यांनी परवानगी घेऊन नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. नियमाचे उल्लंघन झाल्यास गुन्हा दाखल केला जाईल असे त्यांनी सांगितले. यावेळी कुडाळ पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील सर्व धर्मीय उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!