Wednesday, November 5, 2025
Google search engine
Homeआपलं कुडाळप्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत कर्ज वाटप प्रक्रिया कुडाळ नगरपंचायतीमध्ये सुरू

प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत कर्ज वाटप प्रक्रिया कुडाळ नगरपंचायतीमध्ये सुरू

कुडाळ नगरपंचायतीमध्ये ‘स्वनिधी भी स्वाभिमान भी’ पंधरवडा शिबिराचे आयोजन

 

कुडाळ | प्रतिनिधी 

कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर ०१ जून २०२० रोजी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी ह्या योजनेची घोषणा केली आहे. सदर योजनेस जोडूनच केंद्र सरकारने स्वनिधी से समृद्धी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्या अनुषंगाने भारत सरकार नवी दिल्ली यांनी स्वनिधी भी स्वाभिमान भी पंधरवाडा आयोजित करणेबाबत निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार कुडाळ नगरपंचायत येथे स्वनिधी भी स्वाभिमान भी पंधरवड्याचे दि. १ ते १५ डिसेंबर २०२४ या दरम्यान आयोजन करण्यात आलेले आहे.

या कार्यक्रमांतर्गत बँकेकडून परत आलेले कर्ज प्रकरणे पडताळणी करून निकाली काढणे. बँकेकडे प्रलंबित कर्ज मंजूर प्रकरणे वितरित करणे, पथविक्रेत्यांची डिजिटल सक्रियता वाढविणे, रक्कम रु.१०,०००/-, रु.२०,०००/- व रु.५०,०००/- रुपयांचे कर्ज वाटप इ. उपक्रम राबविले जातील. त्याअनुषंगाने गुरुवार दि. ५ डिसेंबर रोजी कुडाळ नगरपंचायत कार्यालयात पथविक्रेते यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये पथविक्रेत्यांनी डिजिटल व्यवहार कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले तसेच सदर कर्ज प्रकरणाकरिता काढण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा, प्रधानमंत्री सुरक्षा विमा व प्रधानमंत्री जनधन बचत खाते विविध योजनांची पॉलिसीची माहिती पथविक्रेत्यांना दिली. सदरचा कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. अरविंद आनंद नातू मुख्याधिकारी कुडाळ नगरपंचायत यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला असून सदर कार्यक्रमात श्री. राजू पठाण कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी, श्री. निलेश म्हाडेश्वर लिपिक कर व मिळकत विभाग, श्री. अतुल आडसूळ समुदाय संघटक DAY-NULM, शैलेश नेवाळकर, वैष्णवी पेडणेकर इ. अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!