*व्हिजनरी नेतृत्व आमदार निलेश राणेंचा सातत्यपूर्ण पाठपुरावा यशस्वी.*
कुडाळ | प्रतिनिधी
आमदार निलेश राणे मंत्रालयीन पातळीवरील सातत्याने पाठपुरावा करून अनेक प्रलंबित कामांसाठी निधी उपलब्ध करून घेतला आहे, नुकताच समाजकल्याण अंतर्गतसुद्धा २ कोटी रुपयांचा निधी कुडाळ मतदारसंघात मंजूर झाला असून समाजकल्याण विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष घटक योजनेअंतर्गत कुडाळ व मालवण तालुक्यातील एकूण ६ समाज मंदिर बांधकामासाठी प्रस्तावित आहेत. यात आता कुडाळ मतदारसंघात एकूण १३ कोटी ५० लाखांच्या विकासकामांना शासनाची मंजुरी मिळाली आहे. यात धार्मिक पर्यटनस्थळांच्या विकासासहित पर्यटनदृष्ट्या महत्वपूर्ण स्थळांवर पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी मंजूर केल्याबद्दल आमदार निलेश राणे यांनी पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांचे आभार व्यक्त केले आहेत. या कामांमध्ये डिगस चोरगेवाडी धरणपरिसर पर्यटन दृष्ट्या विकसित करणे. देशातील सर्वात पहिले असलेले नेरूर कवीलकाटे साई मंदिर परिसर सुशोभीकरण करणे, देवी महालक्ष्मी मंदिर परिसर नारूर परिसर सुशोभीकरण करणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाट तलाव पर्यटनदृष्ट्या विकसित करणे, चिंदर स्टेपचर्च परिसर पर्यटन पर्यटन दृष्ट्या विकसित करणे, भगवती मंदिर परिसर आंब्रड पर्यटन दृष्ट्या विकसित करणे या कामांसाठी एकूण १३ कोटी ५० लक्ष एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे.


