Friday, December 5, 2025
Google search engine
Homeआपलं कुडाळमहायुतीसाठी आम्ही सुद्धा इच्छुक आहोत पण मैत्रीपूर्ण निवडणूक होत असेल तर आमच्या...

महायुतीसाठी आम्ही सुद्धा इच्छुक आहोत पण मैत्रीपूर्ण निवडणूक होत असेल तर आमच्या जवळही त्याच ताकदीचे उमेदवार आहेत – उद्योग मंत्री व संपर्कप्रमुख उदय सामंत

कुडाळ | प्रतिनिधी

महायुतीसाठी आम्ही सुद्धा इच्छुक आहोत पण मैत्रीपूर्ण निवडणूक होत असेल तर आमच्या जवळही त्याच ताकदीचे उमेदवार आहेत आणि त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत असे उद्योग मंत्री व संपर्कप्रमुख उदय सामंत यांनी कुडाळ येथे आयोजित केलेल्या शिवसेनेच्या कुडाळ व मालवण आढावा बैठकीत सांगितले तसेच त्यांनी यावेळी आमदार निलेश राणे यांच्या संघटनात्मक कामाचे तोंड भरून कौतुक केले या आढावा बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष काका कुडाळकर तसेच उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

कुडाळ येथे शिवसेनेची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला उद्योग मंत्री उदय सामंत माजी पालकमंत्री दीपक केसरकर आमदार निलेश राणे माजी आमदार राजन तेली उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत संजू परब माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पळते महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते जिल्हा सचिव दादा साईल, युवा सेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर आनंद शिरवलकर दिनेश साळगावकर जिल्हा संघटक अंजना सामंत, उद्योजक श्री परब कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे दीपक नारकरकिशन मांजरेकर विश्वास गावकर मालवण शहर प्रमुख दीपक पाटकर, कुडाळ नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर युवती प्रमुख सोनाली पाटकर आदी उपस्थित होते.

यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की कार्यकर्त्यांनी कुठल्याही आमिषाला बळी पडू नका आपल्या पक्षाचे काम प्रामाणिकपणे करा आमदार निलेश राणे हे त्याच्यासाठी आदर्श आहेत जेव्हा त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यांनी पक्ष कसा वाढेल याकडे लक्ष दिला त्यांनी खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून घडलेली शिवसेना बघितली आहे. त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता आणि आता पुन्हा एकदा आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शिवसेना वाढत आहे पुढील येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमदार निलेश राणे हे समोरच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही असे सांगून ते फक्त आपल्या मतदार संघापुरते काम करत नाहीत तर त्यांनी आता कणकवली मध्ये सुद्धा लक्ष घालायला सुरुवात केली आहे असे सांगत असताना त्यांनी सांगितले की महायुती व्हावी ही आमची सुद्धा इच्छा आहे पण स्वबळावर लढायचं असेल तर आमच्या जवळ सुद्धा तेवढ्याच ताकदीचे उमेदवार आहेत ही निवडणूक मैत्रीपूर्ण लढू असे म्हटले जात आहे ते सुद्धा आम्ही करू आणि निवडणूक जिंकू असे त्यांनी सांगितले या निवडणुकीमध्ये आपले अस्तित्व आणि किंमत दाखवण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे कोणाला एकाला तिकीट मिळाले नाही म्हणून नाराज न होता ज्याला तिकीट मिळाले आहे त्याचे काम सर्वांनी केले पाहिजे आता तिकिटे मागायला अनेक जण येतील पण गेल्या पाच वर्षांमध्ये ज्यांनी संघटनेसाठी काम केले आहे त्यांचा विचार संघटना करणार आहे त्यासाठी इच्छुक उमेदवारांची मुलाखत सुद्धा घेतली जाईल निवडणूक म्हटली की ती रणनीती ठरवूनच लढवावी लागते ही रणनीती वरिष्ठ नेत्यांकडून ठरवण्यात येईल तसे काम केले जाईल कोणीही आमिषाला बळी पडू नका तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य केले जाणार आहे आता आपल्या पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू आहे जीवाला जीव देणारे आमदार निलेश राणे हे तुमच्या सोबत आहेत तर मार्गदर्शक म्हणून माजी मंत्री दीपक केसरकर आहेत असे सांगून सात नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पक्षाचे नेते एकनाथ शिंदे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत त्यामुळे प्रत्येकाने आपल्या संघटनेची ताकद दाखवण्याची गरज असल्याचे त्यांनी या बैठकीत सांगितले.

या बैठकीमध्ये माझी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले की महायुती होणार की नाही हे अद्याप माहित नाही पण आपण गावांमध्ये जाऊन आपली संघटना मजबूत करून या निवडणुकीमध्ये आपण स्वबळावर निवडणूक लढवणार आहोत ही जिद्दबालिकली पाहिजे कोकण म्हणजे सेनेचा बालेकिल्ला आणि हा बालेकिल्ला तसाच अभेद ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कार्यरत राहिले पाहिजे ही लढाई तत्त्वांशी आहे तसेच कार्यकर्त्यांची ही लढाई आहे आमच्या निवडणुका झाल्या आता तुमच्या निवडणुकांसाठी आम्ही प्रचाराला तुम्ही सांगाल तिथे येणार आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले. तर माजी आमदार राजन तेली यांनी सांगितले की युती झाली तर ठीक आहे पण भांडत राहण्यापेक्षा आपल्या पक्षाचे काम करणे गरजेचे आहे युती झाली तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्यावर महायुतीचा झेंडा फडकणार पण युती झाली नाही तर आपण स्वबळावर लढवून भगवा झेंडा फडकवू असे सांगून खासदार नारायण राणे ज्यावेळी कार्यकर्त्यांना शब्द द्यायचे त्यावेळी त्या शब्दाच्या पुढे कोणी बोलत नव्हते त्यांचा शब्द प्रमाण मानला जात होता आताही त्यांचा शब्द प्रमाण आहे आपले नेते जो उमेदवार देतील त्याला सर्वांनी सहकार्य करून निवडून आणायचा आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुडाळ तालुका प्रमुख दीपक नारकर यांनी केले तर सूत्रसंचालन जिल्हा सचिव दादा साईल यांनी केले.

 

पक्षप्रवेश

खासदार नारायण राणे यांचे जुने सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला तसेच यावेळी कुडाळ ग्रामपंचायतीचे माजी सदस्य अशोक शिरसाट राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद घाडगे तसेच पडवे, गावराई या गावांमधील अनेक उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला

 

आता नाही तर कधी नाही आमदार:- निलेश राणे

या आढावा बैठकीमध्ये आमदार निलेश राणे यांनी सांगितले की भाजपमध्ये असताना मला या मतदार संघाचा प्रमुख केला होता आणि जो मतदार संघाचा प्रमुख असतो त्याला आमदारकीची तिकीट मिळते असा नियम मानला जातो पण तसे माझ्या बाबतीत काही घडले नाही जेव्हा ही परिस्थिती निर्माण झाली तेव्हा माझे वडील खासदार नारायण राणे व माझी आई नीलम राणे यांचा आशीर्वाद घेऊन मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला जेव्हा प्रवेश झाला त्यावेळी खासदार राणे साहेबांनी सांगितले की ज्या पक्षांमध्ये प्रवेश केला आहे त्या पक्षाचे प्रामाणिक काम करून तो पक्ष वाढला पाहिजे यासाठी १०० टक्के योगदान दिले पाहिजे आणि त्यांच्या या सांगितलेल्या मार्गदर्शनाचा अवलंब मी करीत आहे मला कोणत्याही पक्षावर टीका करायची नाही पण माझा पक्ष वाढवण्यासाठी मेहनत करायचे आहे आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी मला आमदार बनवलं त्यांना आयुष्यात कधीही विसरणार नाही. स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये आम्ही महायुतीचा आग्रह धरत होतो अनेकांशी बोलणेही झाले होते पण आम्हाला जर कमी समजत असतील तर आम्ही स्वबळावर लढायला तयार आहोत आणि ही लढाई ते ज्या प्रकारात लढणार आहेत त्याच प्रकारात आम्ही सुद्धा लढणार आहोत त्याच ताकतीने आम्ही सुद्धा उतरणार आहोत ही निवडणूक जिंकण्यासाठी आम्ही लढणार आहोत शिवसेनेची किंमत काय आहे हे दाखवून देणार आहोत कारण अनेक तडजोड आम्ही केली पण आता तडजोड नाही आता फक्त निवडणूक जिंकण्यासाठी उतरायचं त्यासाठी लागणारे सगळं काही आम्ही कार्यकर्त्यांना देणार आहोत त्यामुळे कार्यकर्त्यांनी सुद्धा ही निवडणूक गांभीर्याने घ्या उमेदवारी कोणाला मिळणार यापेक्षा शिवसेना तशी जिंकून येणार याकडे सर्वांनी लक्ष द्या असे आमदार निलेश राणे यांनी यावेळी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!