Tuesday, November 11, 2025
Google search engine
Homeआपलं कुडाळबेपत्ता झालेल्या मायलेकीचा कुडाळ पोलीसांनी घेतला शोध

बेपत्ता झालेल्या मायलेकीचा कुडाळ पोलीसांनी घेतला शोध

नातेवाईकांच्या करण्यात आले स्वाधीन 

कुडाळ | प्रतिनिधी 

पिंगुळी येथील नापत्ता झालेली सौ वर्षा मनोज गावडे व पाच वर्षीय तिची मुली मनश्री मनोज गावडे या दोघांना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले असून दोन महिन्यानंतर आई व मुलगी पोलिसांच्या ताब्यात मिळाली आहे या दोघांनाही त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

दि. ६ ऑक्टोंबर रोजी पिंगुळी येथील राहणारी महीला सौ वर्षा मनोज गावडे (वय २९ ) ही आपले ५ वर्षाची मुलगी मनश्री मनोज गावडे हिचेसह आपले घरातून कोणास काही न सांगता निघुन गेली त्याबाबत तिचे पतीने दिले तक्रारीवरुन कुडाळ पोलीस स्टेशन येथे नापत्ता दाखल करण्यात आलेली होती.

सदर महीला ही आपले लहान मुलीसह नापत्ता झाल्यामुळे सदर प्रकरण हे गंभीर असल्याने पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले, उप विभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांनी नापत्ता महीला व तिचे अल्पवयीन मुलीचा शोध घेण्याबाबत वेळोवेळी सुचना दिलेल्या होत्या.

वरीष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे श्री राजेंद्र मगदुम, पोलीस निरीक्षक, कुडाळ पोलीस स्टेशन यांनी स्वतंत्र पोलीस पथक स्थापन केले होते. सदर नापत्ता महीलेचे ठावठिकाणाबाबत ती वापरत असलेल्या मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माहीती घेता सदरची महीला ही सांगली जिल्यातील कोकीळ, कवठेमहाकाळ या ठिकाणी असल्याबाबत माहीती मिळून आल्याने तात्काळ सदर ठिकाणी पोलीस पथक पाठवून सदर महीलेस तिचे मुलीसह आज दि. १६ डिसेंबर रोजी ताब्यात घेवुन कुडाळ पोलीस स्टेशन येथे आणुन तिचे नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आलेले आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले, उप विभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र मगदुम यांचे सुचनानुसार पोलीस हवालदार कृष्णा परुळेकर, हरेश पाटील, महीला पोलीस हवालदार सारीका बांदेकर यांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!