एमआयडीसीने ‘ते’ अतिक्रमण अखेर हटविले ; पोलीस बंदोबस्तात हटविले अतिक्रमण

0

कुडाळ | प्रतिनिधी

कुडाळ एमआयडीसीने संत राऊळ महाराज महाविद्यालया जवळील अखेर अतिक्रमण आज (शुक्रवारी) पोलीस बंदोबस्तात हटविले. हे अतिक्रमण काढताना विरोध झाला मात्र पोलीस बंदोबस्त असल्यामुळे अतिक्रमण हटवायला बादा आली नाही. हे अतिक्रमण हटवल्यामुळे आता रस्त्याचे रुंदीकरण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कुडाळ एमआयडीसीचा रस्ता राज हॉटेल ते अभिमन्यू हॉटेल पर्यंत आहे या रस्त्याचे सध्या रुंदीकरणाचे काम सुरू झाले आहे. दरम्यान संत राऊळ महाराज महाविद्यालयाजवळ नाईक कुटुंबीयांनी केलेले अतिक्रमण हटवण्यासाठी अनेक वेळा नोटीसा देण्यात आल्या होत्या या रस्त्याच्या रुंदीकरणांमध्ये हे अतिक्रमण अडसळ ठरत होते. 

अखेर एमआयडीसी प्रशासनाने पोलीस बंदोबस्त घेऊन नाईक कुटुंबीयांनी केलेले अतिक्रमण हटवले यावेळी विरोध करण्यात आला मात्र पोलीस बंदोबस्त असल्यामुळे काहीसा विरोध मावळला आणि हे अतिक्रमण पाठविण्यात आले यावेळी उप अभियंता रेवंडकर, एमआयडीसीचे भूमापक दर्शना एकावडे, पोलीस उपनिरीक्षक क-हाडकर आदी कर्मचारी उपस्थित होते.