कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ तलाठी कार्यालय येथील सागाची झाडे चोरल्या प्रकरणी कुडाळ शहरातील गुरुनाथ पेंटर चिकन सेंटरचे मालक गुरुनाथ पेंटर यांना कुडाळ पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांची सशर्त जामीनावर मुक्तता करण्यात आली.
कुडाळ शहरातील तलाठी कार्यालय येथील तोडण्यात आलेली सागाची झाडे ७ डिसेंबर रोजी चोरीला गेली होती. याबाबत कुडाळ तहसीलदार तसेच पोलीस ठाण्यामध्ये चौकशीचे अर्ज दाखल आले होते या चौकशीमध्ये टेम्पोमध्ये सागाची झाडे भरणाऱ्या हमालाना पोलिसांनी चौकशीसाठी बोलाविले. या हमालानी ही झाडे कोणाच्या सांगण्यावरून टेम्पोमध्ये भरली हे सांगितले तसेच त्यांनी कोणत्या सॉ मिलवर ही झाडे घेऊन गेले याची सुद्धा माहिती दिली त्यानुसार कुडाळ शहरात गुरु पेंटर चिकन सेंटरचे मालक गुरुनाथ पेंटर याला ताब्यात घेऊन अटक केली. दरम्यान न्यायालयाने जामीनावर मुक्तता केली.
