नायब तहसीलदार आढाव व कर्मचाऱ्यावर डंपर घालून जीवे मारण्याचा डंपर चालकांकडून झाला प्रयत्न

0

कुडाळ | प्रतिनिधी

अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या डपंरांना पिंगुळी गुढीपूर येथे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी रोखले. मात्र या रोखलेल्या चार डंपरांपैकी दोन डपंरांच्या चालकांनी नायब तहसीलदार प्रतीक आढाव व कर्मचारी यांच्यावर डंपर घालून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.