खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वेताळ बांबर्डे येथील एकलव्य संस्थेमधील विद्यार्थ्यांना कुडाळ नगरपंचायतीच्या नगरसेवकांच्या वतीने शालेयपयोगी साहित्य वाटप…तसेच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला..

0

कुडाळ प्रतिनिधी

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वेताळ बांबर्डे येथील एकलव्य संस्थेमधील विद्यार्थ्यांना कुडाळ नगरपंचायतीच्या नगरसेवकांच्या वतीने शालेयपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला.

कुडाळ नगरपंचायतीच्या नगरसेवकांनी खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस समाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वेताळ बांबर्डे येथील एकलव्य संस्थेमधील विद्यार्थ्यांना खाऊ व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, संस्था संचालिका रेणूका गावसकर, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक राजीव कुडाळकर, नगरसेविका सौ नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, माजी नगरसेवक राकेश कांदे आदी उपस्थित होते.