कुडाळ तालुक्यातील डिगस, आवळेगाव, ओरोस येथील विकास कामांची भूमिपूजने आमदार निलेश राणे यांच्या हस्ते ..

0

कुडाळ प्रतिनिधी 

माझ्या मतदारसंघांमध्ये विकास निधी कमी पडू देणार नाही याची जबाबदारी मी घेतो मी कोणावरही टीका करणार नाही. पण गेल्या दहा वर्षात सत्तेचा वापर जनतेसाठी नाही तर स्वतःच्या विकासासाठी करणारे नेते या भागांमध्ये आहेत असे आमदार निलेश राणे यांनी डिगस येथील रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमाविषयी विरोधकांचा समाचार घेतला.

कुडाळ तालुक्यातील डिगस, आवळेगाव, ओरोस येथील विकास कामांची भूमिपूजने आमदार निलेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. कुडाळ तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये गेली दहा वर्ष विकास रखडलेला होता या विकासाला चालना देण्याचे काम आमदार निलेश राणे यांनी सुरू केले आहे. 

डिगस येथील मुख्य रस्ता ते हिर्लोकच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण तसेच आवळेगाव येथील जरीमरी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण या कामांचे भूमिपूजन झाले यावेळी आमदार निलेश राणे यांनी सांगितले की, विकास हा जनतेचा केला गेला पाहिजे, स्वतःचा विकास करणे म्हणजे राजकारण नव्हे. या ठिकाणच्या नेत्यांनी गेल्या दहा वर्षात सत्तेचा वापर स्वतःच्या विकासासाठी केला आहे त्यामुळे या गावाचा विकास रखडला आहे पण यापुढे असे होणार नाही या गावांमध्ये आवश्यक तू निधी दिला जाईल महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघांपैकी कुडाळ विधानसभा मतदारसंघांमध्ये जास्तीत जास्त निधी आणण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे तसेच या ठिकाणच्या जनतेचे अर्थकारण बदलण्याचाही माझा प्रयत्न राहणार आहे शहरातील जनता जसे जीवन जगते तसे जीवन ग्रामीण भागातील जनतेने जगावे यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे असे सांगून पुढील काळात आपल्या ज्या मागण्या असतील त्या पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

डिगस येथील रस्त्याच्या भूमिपूजनवेळी शिवसेनेचे उपनेते संजय आंग्रे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष दिपक नारकर, दादा साईल, नित्यानंद कांदळगावकर, रमेश घोगळे, अरविंद करलकर, सुरेश सुर्वे, भिवाजी सावंत, विजय लुडबे, योगेश सावंत, तुषार सावंत, अमर घाडी, सुरज जाधव, मनोज पाताडे तसेच आवळेगाव येथील ग्रामस्थ तसेच महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.