Wednesday, September 23, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीपडवे लाईफ टाईम हॉस्पिटल मध्ये आता मिळणार अत्याधुनिक न्यूरोसर्जरी सेवा

पडवे लाईफ टाईम हॉस्पिटल मध्ये आता मिळणार अत्याधुनिक न्यूरोसर्जरी सेवा

देश विदेशात सेवा दिलेले प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. फारुक सईद अहमद पडवे हॉस्पिटल मध्ये देत आहेत सेवा

 

  • मेंदू व मणक्यांच्या व इतर गुंतागुंतीच्या आजारांवर आता मुंबई, गोवा,पुणे, बेळगाव जाण्याची गरज नाही 
  • जिल्ह्याला तज्ज्ञ न्यूरोसर्ज ची असलेली गरज एसएसपीएम मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाईम हॉस्पिटल’ ने केली पूर्ण
  • अपघातानंतर डोक्याच्या व मणक्याच्या गंभीर आजारावर होणार तातडीने उपचार
  • शासकीय योजनांचाही घेता येणार रुग्णांना फायदा

 

पडवे : सिंधुदुर्ग व परिसरातील रुग्णांसाठी मेंदू व मणक्याशी संबंधित गुंतागुंतीच्या आजारांवर अत्याधुनिक उपचार मिळण्याच्या दृष्टीने पडवे (ता. कुडाळ) येथील राणेंच्या ‘एसएसपीएम मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाईम हॉस्पिटल’च्या न्यूरोसर्जरी विभागात प्रख्यात आणि अनुभवी तज्ज्ञ न्यूरोसर्जन डॉ. फारुक सईद अहमद यांच्या सेवा उपलब्ध झाल्या आहेत. यामुळे कोकणातील रुग्णांना आता मेंदू व मणक्याच्या उपचारांसाठी मुंबई,गोवा, बेळगाव, पुणे किंवा इतर मोठ्या शहरांत जाण्याची आवश्यकता भासणार नाही.

डॉ. फारुक सईद अहमद हे मेंदू व मणक्यांच्या शस्त्रक्रियांमधील आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदीर्घ अनुभव असलेले तज्ज्ञ डॉक्टर आहेत. त्यांनी मुंबईतील नामांकित सर एच. एन. हॉस्पिटल आणि जसलोक हॉस्पिटल येथून न्यूरोसर्जिकल प्रशिक्षण पूर्ण केले आहे. तसेच त्यांनी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये सुमारे साडेअकरा वर्षे तर सौदी अरेबियातील जुबैल जनरल हॉस्पिटलमध्ये १८ वर्षे ३ महिने न्यूरोसर्जरी कन्सल्टंट म्हणून यशस्वी सेवा बजावली आहे.

 

 *उपलब्ध वैद्यकीय सेवा व उपचार*

 

* मेंदूच्या गाठी (ट्युमर) व क्लिष्ट शस्त्रक्रिया

* मेंदूतील रक्तस्राव (Bleed) व तत्काळ आपत्कालीन उपचार

* मणक्याच्या डिस्क, स्पाईन विकार व मणक्यांच्या सूक्ष्म शस्त्रक्रिया

* अपघातजन्य डोक्याच्या व मणक्याच्या गंभीर इजांवर (Brain & Spine Trauma) उपचार

* आधुनिक एंडोस्कोपिक व मायक्रोस्कोपिक न्यूरोसर्जरी सुविधा

 

रुग्णालयात २४ तास आपत्कालीन सेवा, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, ‘आयुष्मान भारत योजना’ तसेच ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ लागू असून गरजू व सर्वसामान्य रुग्णांना या योजनांचा लाभ मिळणार आहे.

अधिक माहिती व नावनोंदणीसाठी रुग्णांनी ८२०८३२८११८ किंवा ९३७००५६०७६ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन एसएसपीएम हॉस्पिटल प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!