कुडाळ | प्रतिनिधी
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या क्रूर आणि अमानुष दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटक आणि स्थानिक नागरिकांचा बळी गेला त्याबद्दल कुडाळ येथील मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करून या दहशतवाद्यांना कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे कुडाळ तहसीलदार विरसिंग वसावे यांच्याजवळ केली आहे.
या निवेदनात मुस्लिम समाजातर्फे असे म्हणण्यात आले आहे की हिंसक आणि मानवी मूल्यांना काळीमा फासणाऱ्या त्यांचे कोणत्याही प्रकारचे समर्थन होऊ शकत नाही. आमचा समाज नेहमी शांतता सद्भाव आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या बाजूने उभा राहिलेला आहे. यापुढे राहील. दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्या निर्दोष नागरिकांबद्दल आमच्या मुस्लिम समाजातर्फे शोक व्यक्त करत आहोत आणि या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करीत आहोत. हा हल्ला अत्यंत भ्याड व मानवी आणि देशाच्या शांततेत बाधा आणणार आहे. भारताचे नागरिक म्हणून आम्ही सर्व धर्मीय लोक एकत्र आहोत आणि अशा हिंसक कृत्य करणाऱ्यांना कठोर शासन व्हायला हवे प्रशासनाच्या व सरकारच्या योग्य ती कारवाई करण्याच्या निर्णयास आमचा पूर्ण पाठिंबा दर्शवतो भारतीय मुस्लिम समाज या देशाच्या एकतीच्या बाजूने उभा आणि अशा घटनांचा निषेध करतो राज्य व केंद्र शासना पाशी मागणी करतो की अशा घटनांना आळा घालण्यासाठी कडक पावले उचलावीत व संबंधित दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी मुस्लिम समाजाचे जिल्हाध्यक्ष मुश्ताक शेख, नाझीम मुकादम, सरफराज मुकादम, मुस्ताक शेख, सरफराज नाईक, जावेद नाईक, फारूक दोस्ती, एजान नाईक, जहेन शेख, मुबीन दोस्ती, डॉ. मुजफ्फर आवटे, नियाज शहा, अब्दुल रहीम गोदड आदी उपस्थित होते.


