कुडाळ | प्रतिनिधी
सर्व सोयी सुविधांनी युक्त अद्ययावत जिम कुडाळ नगरीत साकारली आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. या भागाचे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून भविष्यात मोठ मोठ्या बॉडीबिल्डिंग, वेटलिफ्टिंग स्पर्धा घेण्यासाठी निश्चितच सहकार्य केले जाईल असे प्रतिपादन महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य अँड संग्राम देसाई यांनी गिअर अप जिम अँड वेलनेस सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी सोमवारी रात्री केले.
सिंधुरत्न प्रबोधिनीच्या माध्यमातून कुडाळ शहरात पोस्ट कार्यालय नजिक कुडाळेश्वर प्रसाद कॉम्प्लेक्स येथे गिअर अप जिमची , गिअर अप जिम अँड वेलनेस सेंटर ही दुसरी शाखा साकारली आहे .
त्यांचे उद्घाटन ॲड संग्राम देसाई यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात पार पडले. यावेळी व्यासपीठावर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रणजीत देसाई, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, उद्योजक गजानन कांदळगांवकर, सिंधूरत्न प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष हेमंत जाधव
स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई अधिकारी प्रशांत पवार ,उद्योजक प्रसाद दळवी, सीए सागर तेली माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, सिंधूरत्न प्रबोधिनीचे अध्यक्ष साईराज जाधव, सचिव अनुप्रिया जाधव, खजिनदार पूजा जाधव ,सौ वर्षा पवार, विनायक पिंगुळकर, विशाल कदम ,सुधा कुडाळकर, श्री महाजन, दीपक गावडे, भूषण तेजम, डॉ सुरज शुक्ला, प्रतीक्षा सावंत ,मृणाल सावंत , डॉ शरावती शेट्टी,धीरज परब, प्रदीप माने, कविता शेळके, ट्रेनर पंकज गावडे, असिस्टंट ट्रेनर दर्शन मयेकर,मंदार वायगणकर लायन्स क्लब,रोटरी क्लब चे पदाधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवर आदी उपस्थित होते
यावेळी बोलताना अँड देसाई म्हणाले, साईराज जाधव या युवकाने दहा वर्षाच्या गिअर अप जिम पिंगुळीच्या यशस्वी वाटचालीनंतर आता कुडाळ नगरीत गिअर अप जिम अँड वेलनेस सेंटर च्या माध्यमातून टाकलेली पावले भविष्याची वेध घेणारी आहेत.त्यांची जी स्वप्ने आहेत ती पूर्ण करण्यासाठी निश्चितच सोबत असेन मोठ मोठ्या शहरात जिकडे जिकडे जाऊ तिकडे तिकडे गिअर अप जिम चे नांव दिसले पाहिजे अशी कामगिरी करायची आहे. जिममध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाला मित्र बनव असे सांगितले .
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री काळे यांनी प्रत्येक माणसासाठी व्यायाम ही काळाची गरज आहे किमान 24 तासातला एक तास तरी प्रत्येकाने आपल्या शरीरासाठी देऊन आपण तंदुरुस्त कसे राहू यासाठी प्रयत्न करा असे आवाहन केले. नगराध्यक्ष प्राजक्ता शिरवलकर यांनी अद्ययावत जिम या ठिकाणी साकारलेली आहे त्याचबरोबर योगा, झुब्बा, फिजिओथेरपी, मसाज सेंटर या सर्वच गोष्टी या जिम मध्ये मिळत असल्यामुळे येणाऱ्या प्रत्येकासाठी ही जिम आशेचा किरण असेल. भविष्यात या जिमच्या दोन शाखा झाल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात या शाखेचा विस्तार होताना अन्य ठिकाणी सुद्धा या शाखा विस्तारल्या जाव्यात असे सागून शुभेच्छा दिल्या. गटविकास अधिकारी श्री नाईक यांनी साईराज जाधव व त्यांच्या परिवारांने जिमसारखा एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे, तर शिवसेना महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर यांनी आजची युवा पिढी ही अन्य वाईट गोष्टीकडे वळण्यापेक्षा जिमकडे वळून त्याने आपले आयुष्य अधिक सुदृढ करावे असे आवाहन केले ही शहरवासीयांसाठी परिपूर्ण असणारी अद्ययावत जिम आहे त्याचा निश्चितच लाभ घ्या असे आवाहन केले यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी जिम सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणारे सिंधुरत्न प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते हेमंत जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन विशाल कदम यांनी केले.
बॉक्स
भविष्यात राज्य पातळीवरील स्पर्धा घेतल्या जातील साईराज जाधव
सिंधू रत्न प्रबोधिनीचे अध्यक्ष साईराज जाधव यांनी गिअर अप जिमच्या माध्यमातून व्यायामाचे धडे देतानाच सामाजिक शैक्षणिक आरोग्य क्षेत्रातही या जिमने मदतीच्या दिशेने वाटचाल केली आहे. भविष्यात जिमच्या माध्यमातून विविध जिल्हा राज्यपातळीवरील स्पर्धा घेतल्या जातील या गिअर अप जिम अँड वेलनेस सेंटर मध्ये अद्ययावत मशीनरी कार्यरत आहे. व्यायामाबरोबरच स्टीम, कार्डिओ, मसाज सेंटर ,फिजिओथेरपी सप्लीमेंट न्यूट्रिशन ,शॉवर या सुविधा आहेत. पिंगुळी येथे सुरू करण्यात आलेल्या जिमला दहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर कुडाळ शहरांमध्ये ही सेवा देता यावी या अनुषंगाने सिंधुरत्न प्रबोधिनीच्या माध्यमातून गिअर अप जिम अँड वेलनेस सेंटर सुरू करण्यात आले आहे.
फोटो
सिंधू रत्न प्रबोधिनीच्या गिअर अप जिम अँड वेलनेस सेंटरचे उद्घाटन करताना अँड संग्राम देसाई श्री काळे रणजीत देसाई वासुदेव नाईक हेमंत जाधव अनुप्रिया जाधव साईराज जाधव वर्षा कुडाळकर पूजा जाधव व मान्यवर छायाचित्र अजय सावंत