कुडाळ शहरातील श्रीदेवी भवानी मंदिर वाघ सावंत टेंब मातेचा त्रैवार्षिक गोंधळ १९ व २० मे रोजी

कुडाळ | प्रतिनिधी

कुडाळ शहरातील श्रीदेवी भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ १९ व २० मे रोजी श्रीदेवी भवानी मंदिर वाघ सावंत टेंब येथे होणार आहे.

तीन वर्षांनी श्रीदेवी भवानी मातेचा गोंधळ सावंत- प्रभावळकर साजरा करतात. सावंत- प्रभावळकर राजघराण्याची कुलस्वामिनी श्रीदेवी भवानी आहे. तिचा हा गोंधळ साजरा केला जातो. या निमित्ताने यावर्षी सोमवार १९ मे रोजी सकाळी ८ वा. देवीची नित्य पूजा, सकाळी ९ वा. शक्ती पाठ वाचन, सकाळी ११ वा. कुंकूमार्चन, दुपारी २ वा. आरती व नैवेद्य, मंगळवार २९ मे रोजी सकाळी ७ वा. देवीची नित्य पूजा, सकाळी ९ वा. देवीची मानाची ओटी भरून इतर ओट्या भरण्याचा कार्यक्रम, सकाळी ११ वा. बलिदान, सायं. ६ वा. महानैवेद्य, सायंकाळी ७ वा. देवीचे मांडावर आगमन नंतर ओट्या भरणे कार्यक्रम रात्री ८ वाजल्यापासून महाप्रसाद होणार आहे. तरी सर्व भक्तांनी त्रैवार्षिक गोंधळाला उपस्थित राहावे असे आवाहन सावंत- प्रभावळकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.