Saturday, May 9, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळमान्सून पूर्व तयारीच्या अनुषंगाने कुडाळ नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी बैठक घेऊन...

मान्सून पूर्व तयारीच्या अनुषंगाने कुडाळ नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी बैठक घेऊन सर्व विभागाचा आढावा घेतला 

कुडाळ | प्रतिनिधी 

मान्सून पूर्व तयारीच्या अनुषंगाने कुडाळ नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी बैठक घेऊन सर्व विभागाचा आढावा घेऊन मान्सून मध्ये सर्व विभागाने सतर्क राहावे असे आवाहन केले. 

मान्सून महिन्यामध्ये अनेक आपत्ती साथीचे रोग पसरतात त्यामुळे मान्सून पूर्व तयारीसाठी कुडाळ नगरपंचायत येथे बैठक घेण्यात आली या बैठकीला गटनेता विलास कुडाळकर, नगरसेविका चांदणी कांबळी, श्रुती वर्दम तसेच नगरपंचायतीचे प्रभारी प्रशासकीय अधिकारी राजू पठाण, लेखापाल स्वप्निल पाटील, नळ पाणी योजनेच्या नाडकर्णी, वैद्यकीय अधिकारी शुभम बोरवाडे, राष्ट्रीय महामार्गाचे कनिष्ठ अभियंता रोहित गवास, एमआयडीसीचे उप अभियंता अविनाश रेवणकर, विद्युत वितरण कंपनीचे प्रकल्प येळगुकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, नगरपंचायतीचे कर्मचारी गजानन पेडणेकर उपस्थित होते.

 

या बैठकीमध्ये विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना विद्युत तारांवर आलेली झाडे तोडण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेल्या रस्त्यालगत असलेले गटार साफ करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या तसेच महामार्गावरील ज्या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणावर येतं त्या ठिकाणी उपाययोजना करणार याव्यात असल्या सूचना करून सतर्क रहावे असे सांगण्यात आले. 

यावेळी आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्या की संभाव्य सात रोग तसेच कोरोना प्रादुर्भाव संदर्भात सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले कोणत्याही परिस्थितीत आपत्तीमध्ये दिरंगाई चालणार नाही प्रत्येक अधिकाऱ्यांनी या काळामध्ये कोठेही जाऊ नये जेव्हा आपत्ती निर्माण होईल त्या ठिकाणी तात्काळ येण्यासाठी प्रत्येकाने सतर्कता दाखवली पाहिजे असे नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!