‘प्रत्येक धावण्याचे पाऊल तुमचे हृदय मजबूत करते’ ही टॅगलाईन घेऊन ५, १०,१६ व २१ किलोमीटरची भव्य हाफ मॅरेथॉन
सिंधुदुर्गासह मुंबई, गोवा, कोल्हापूर, बेळगाव, पुणे, रत्नागिरी येथून धावपटू होणार सहभागी
कुडाळ (प्रतिनिधी)
राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर आणि टीम कुडाळ मॉन्सून रन २०२५ तर्फे हाफ मॅरेथॉन दि. १३ जुलै रोजी बॅ. नाथ पै शिक्षण संस्था एमआयडीसी कुडाळ येथून आयोजली असून ‘प्रत्येक धावण्याचे पाऊल तुमचे हृदय मजबूत करते’ ही टॅगलाईन घेऊन ५, १०, १६ तसेच २१ किलोमीटरच्या मधून सिंधुदुर्ग सोबतच मुंबई, गोवा, कोल्हापूर, बेळगाव, पुणे, रत्नागिरी इथूनही धावपटू सहभागी होणार आहेत. तसेच या हाफ मॅरेथॉनचे यजमानपद भूषवण्यासाठी टीम कुडाळ मान्सून रन २०२५ सज्ज असल्याची माहिती टीम कुडाळ मान्सून रन यांनी स्पाइस कोकण येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला डॉ. जी. टी. राणे, श्री. अजित राणे,श्री डाॅ संजय केसरे , श्री. गजानन कांदळगावकर, डॉ. जयसिंग रावराणे, डॉ. प्रशांत सामंत ,श्री सचिन मदने इत्यादी उपस्थित होते.
मुंबई रोड रनर्स संस्थेकडून विशेष सन्मान
सन २०२४ वर्षातील सर्वोत्कृष्ट हाफ मॅराथाॅन आयोजनाचा मानाचा सन्मान मुंबई रोड रनर्स संस्थेकडून कुडाळ मान्सूम रन २०२४ ला सन्मानित करण्यात आले आहे. राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर कुडाळ हे २०२२ पासून कार्यरत असून या दोन वर्षात राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटरने मेडिकल क्षेत्रात अत्यंत महत्त्वाची कामगिरी केली आहे. तसेच आरोग्यासंबंधी जनजागृतीसाठी वेळोवेळी अनेक उपक्रमाचे नियोजन केले आहे.
हॉस्पिटल तर्फे रोटरी क्लब कुडाळ च्या सहयोगाने रक्तदान शिबिर, श्रवण दोष चिकित्सा शिबिर, दंतचिकित्सा शिबिर, फिजिओथेरपी शिबिर, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबिर, असे बरेच कार्यक्रम राबवले जातात.
आरोग्य साठी चालणे किंवा धावणे हे महत्त्वाचे आहे.व्यायाम व आरोग्य या बद्दलची जनजागृती व्हावी यासाठी पावसाळी मॅरेथॉन आयोजित केली आहे. राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर सह सिंधुदुर्ग सायक्लीस्ट असोसीएशन, कुडाळ सायकल क्लब, रांगणा रनर्स,रोटरी क्लब ऑफ कुडाळ व डॉक्टर्स डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब, सिंधुदुर्ग यांचे ज्येष्ठ सदस्य टीम मॉन्सून रन या नावाने उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यास सज्ज आहेत. या मॅरेथॉनसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुभवी धावपटू तसेच इतर जिल्ह्यातील धावपटू सहभागी होणार आहे.
बिल रोवन पदक पुरस्कार प्राप्त श्री प्रसाद कोरगावकर तसेच कॉम्रेड मॅरेथॉन कांस्य पदक प्राप्त श्री ओमकार पराडकर याबरोबर रत्नागिरीचे लोहपुरुष डॉ. तेजानंद गणपत्ये, मुंबईतील लोहपुरुष श्री अरविंद सावंत या प्रसिद्ध धावपटूंची साथ कुडाळ मान्सून रन ची शोभा वाढवेल. आपले हृदय चालत राहावे यासाठी आपण चालत राहण्याचा मोलाचा संदेश घेऊन जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन सिंधुदुर्गातील पहिल्याच होऊ घातलेल्या पावसाळी मॅरेथॉनचा आनंद लुटावा हेच टीम कुडाळ मान्सून रन चे ध्येय आहे. ही स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्व सदस्यांना मेडल व डिजिटल सर्टिफिकेट दिली जाणार असून खुल्या गटातून तसेच वयोमनाप्रमाणे आखलेल्या गटांमधून प्रथम दोन धावपटूंना आकर्षक रोख बक्षीसही देण्यात येणार आहेत.
सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना टी-शर्ट दिले जातील. कुडाळ एमआयडीसी मधून सुरू होणारी ही मॅरेथॉन नेरूर मार्गे वालावल मंदिर येथून नदीपर्यंत जाईल व तिथून पुन्हा एमआयडीसीमध्ये पोहोचेल. ५ किमी ची फन रेस असणार आहे यामध्ये रोख बक्षिस नसणार आहे .पण टी शर्ट व डिजीटल सर्टिफिकेट दिले जाणार आहे.१० किमी ,१६ किमी व २१ किमी प्रकारात वयोगटानुसार आकर्षक रोख बक्षिसे व खुल्या गटासाठीही रोख आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. सहभागी होण्याकरता दूरध्वनी क्रमांक ९४२१२६१२१२वर संपर्क साधावा किंवा www.ranehospital.net या संकेतस्थळावरून नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे
