कुडाळ प्रतिनिधी
योगीयांचे योगी असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान श्री. प.पू. सद्गुरू समर्थ राऊळ महाराज यांचे शिष्य पूज्यनीय श्री प.पु. विनायक (अण्णा) महाराज पिंगुळी यांचा ४ था पुण्यतिथी उत्सवाचे औचित्य साधून निक्षयमित्र कार्यक्रम राबविण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरजू १५० क्षय रुग्णांना जीवनावश्यक वस्तूचे वितरण करण्यात आले.
सदर कार्यक्रमावेळी श्री. प. पु. विनायक (अण्णा) राऊळ महाराज चॅरीटेबल ट्रस्ट, पिंगुळी संस्थेच्या अध्यक्षा प.पु बाईमा, संगीता विनायक राऊळ, सुवर्णाजी आमोणकर, अशोक कदम, विनय पाटील, महादेव पांगे, कोषाध्यक्ष दशरथ राऊळ, सचिव राजन पांचाळ, विश्वस्त, सद्गुरू राऊळ महाराज संस्थान पिंगुळीचे अध्यक्ष विठोबा राऊळ श्री सुनिल फणसेकर सचिव, श्री प्रदीप पुंडलिक अमोणकर विश्वस्त,जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रमेश कर्तस्कर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर, क्षयरोग पर्यवेक्षक श्री लक्ष्मण कदम, सरपंच अजय आकेरकर, श्री. प. पु. विनायक (अण्णा) राऊळ महाराज चॅरीटेबल ट्रस्ट, पिंगुळी व सद्गुरू श्री राऊळ महाराज संस्थान समस्त विश्वस्त मंडळ व समस्त भक्त गण आदि. उपस्थित होते.
डॉ. रमेश कर्तस्कर जिल्हा हिवताप अधिकारी यांनी आरोग्यविषयक उपक्रम राबविल्याबद्दल संस्थेचे आभार मानले श्री लक्ष्मण कदम यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात क्षय रुग्णांना वस्तू वितरण करणारी राज्यातील पहिली संस्था असल्याचे सांगितले त्याचप्रमाणे जिल्ह्यतील १५० ग्रामपंचायतींना टीबी मुक्त ग्रामपंचायत पुरस्कार मिळण्यामध्ये संस्थेचा मोठा हातभार असल्याचे सांगितले.
