Saturday, May 9, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळकुडाळ नगरपंचायतीची नळ पाणी योजनेची पाईपलाईन नादुरुस्त झाल्यानंतर नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, गटनेता...

कुडाळ नगरपंचायतीची नळ पाणी योजनेची पाईपलाईन नादुरुस्त झाल्यानंतर नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर नगरसेवक अभिषेक गावडे यांनी तत्परता दाखवून आपल्या प्रभागांमध्ये आवश्यक त्या ठिकाणी तात्काळ पाणीपुरवठा स्वखर्चाने केला. 

कुडाळ | प्रतिनिधी

कुडाळ नगरपंचायतीची नळ पाणी योजनेची पाईपलाईन नादुरुस्त झाल्यानंतर नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर नगरसेवक अभिषेक गावडे यांनी तत्परता दाखवून आपल्या प्रभागांमध्ये आवश्यक त्या ठिकाणी तात्काळ पाणीपुरवठा स्वखर्चाने केला. 

कुडाळ नगरपंचायतीची नळ पाणी पाईपलाईन भैरववाडी येथे फुटली गेले पाच दिवस त्या ठिकाणी नगरपंचायतीचे कर्मचारी काम करत आहे ही पाईपलाईन आज (शुक्रवारी) सायंकाळी दुरुस्त झाली त्यानंतर नगरपंचायत प्रशासनाकडून शहरातील पाणीपुरवठा शनिवार २४ मे पासून सुरळीत सुरू केला जाईल अशी माहिती देण्यात आली. दरम्यान गेले पाच दिवस पाणी पुरवठा बंद असल्यामुळे कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर गटनेता विलास कुडाळकर नगरसेवक अभिषेक गावडे यांनी तत्परता दाखविली गुरुवारी रात्री भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे आवश्यक असलेल्या नागरिकांना नगरसेवक विलास कुडाळकर यांनी टॅंकरने पाणीपुरवठा केला आज शुक्रवारी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी माठेवाडा, प्रभावळकर वाडा, बाजारपेठ तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, मज्जिद मोहल्ला, मच्छी मार्केटमध्ये असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वसाहती पाणीपुरवठा केला तर नगरसेवक अभिषेक गावडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज नगर, कुडाळेश्वरवाडी अशा ठिकाणी स्वखर्चातून पाणीपुरवठा केला नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी पाणीपुरवठा केला द्यावी त्यांच्या समवेत गटनेता विलास कुडाळकर, शहर प्रमुख रोहित भोगटे, राकेश कांदे, आबा धडाम उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!