Thursday, December 11, 2025
Google search engine
Homeआपलं कुडाळ*सामाजिक कार्यकर्ते श्री रुपेश पावसकर उद्योजक श्री कल्पेश पावसकर यांच्या वडिलांचा म्हणजेच...

*सामाजिक कार्यकर्ते श्री रुपेश पावसकर उद्योजक श्री कल्पेश पावसकर यांच्या वडिलांचा म्हणजेच श्री अशोक जगन्नाथ पावसकर यांचा दैदीप्यमान अभिष्टचिंतन सोहळा सिद्धिविनायक मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात संपन्न……*

सामाजिक कार्यकर्ते श्री रुपेश पावसकर उद्योजक श्री कल्पेश पावसकर यांच्या वडिलांचा म्हणजेच श्री अशोक जगन्नाथ पावसकर यांचा दैदीप्यमान अभिष्टचिंतन सोहळा सिद्धिविनायक मंगल कार्यालय येथे कोल्हापूर संस्थांचे महाराज श्री आनंद महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच श्री अशोक पावसकर यांच्या सौभाग्यवती लक्ष्मी पावसकर श्री रुपेश पावसकर श्री कल्पेश पावसकर सौ.रूद्रा पावसकर कुमार रुद्रेश कुमार हार्दिक तसेच बहिणी सौ रुपाली,सौ.दीपा, सौ प्रणिता, सौ.अश्विनी, तसेच पावसकर यांचे जावई, मेहुणी श्रीमती मांजरेकर, रुपेश पावसकर यांचे मेहुणे श्री प्रवीण धुरी सिंधुदुर्ग भजन संघटनेचे जिल्हाप्रमुख श्री भालचंद्र केळुसकर बुवा या सर्वांनी उपस्थित राहून दैदीप्यमान अभिष्टचिंतन सोहळ्याची शोभा वाढवली तसेच याचे खास आकर्षण म्हणजेच सौ.रुद्रा रुपेश पावसकर यांनी पंच्याहत्तरी म्हणजेच 75 दिव्यांची आरास करून आपल्या सासरे म्हणजेच बाबांचा आनंद द्विगुणीत केला.या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक ज्येष्ठ नागरिकांचे सत्कार करण्यात आले.यामध्ये प.पू.आनंद महाराज,भालचंद्र केळुसकर बुवा,राजू पाटणकर,बाळा घाडी,संजय करलकर, डॉ.तळेकर, हाजिम मुजावर,शेखर परब,सुधीर नेरुरकर,रावजी कदम,सौ. रुद्रा रूपेश पावसकर,बुवा संतोष जोईल,बुवा समीर कदम,स्वरूप सावंत,देवेंद्र अरुण पेडणेकर, दाजी गावडे,प्रसाद परब,हरीश शेरेगावकर यांचे सत्कार करण्यात आले.त्याचबरोबर महिलांना आर्थिक मदत करण्यात आली.यामध्ये छाया म्हाडदळकर, रत्नप्रभा फारसेकर, उषा परब,दिलीप माधव, सुलोचना परब, अजीजा गनी, क्रांती करलकर, विनायक दाभाडे, नदाब मॅडम,समीर माळकर,खतीब मॅडम परमपूज्य श्री राऊळ महाराज मठ, तसेच झाराप येथील मतिमंद मुलांच्या संस्थेला 75 किलो तांदळाचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित करण्यात आला होता यासाठी बुवा श्री संतोष जोईल विरुद्ध श्री समीर कदम यांच्यात 20-20 डबलबारी चा जंगी सामना रंगला या कार्यक्रमात अनेक रसिक स्रोते तसेच राजकारणातील दिग्गज यांनी उपस्थित राहून पावसकर कुटुंबीयांचा आनंद द्विगुणीत केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!