रामचंद्र घाडी यांनी कबुली दिलेल्यापैकी पिंगुळी देवूळवाडी येथील ९३ हजार रुपयांच्या चोरीचा गुन्हा कुडाळ पोलिसांनी दाखल..

कुडाळ | प्रतिनिधी

चोरी प्रकरणी अटकेत असलेल्या रामचंद्र घाडी यांनी कबुली दिलेल्यापैकी पिंगुळी देवूळवाडी येथील ९३ हजार रुपयांच्या चोरीचा गुन्हा कुडाळ पोलिसांनी दाखल केला आहे.

पिंगुळी देवूळवाडी येथील बाळकृष्ण सोमा पावसकर यांच्या घरामध्ये ही चोरी झाली होती यामध्ये रोख रक्कम ५० हजार रुपये तसेच चांदीचा कलश, चांदीची गणेश मूर्ती, चांदीचे निरंजन, चांदीचा करंडा, चांदीची पैजन, चांदीची अंगठी, एक कानातील सोन्याची रिंग असे दागिन्यांचे ४५ हजार मिळून ९३ हजार रुपयांची चोरी झाली होती. या चोरीबाबत रामचंद्र घाडी याने कबुली दिल्यानंतर ही चोरी कुडाळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले