कुडाळ | प्रतिनिधी
नारूर मुख्य रस्ता ते सरनोबतवाडी शाळेकडे जाणारा कॉजवे अतिवृष्टीमध्ये वाहून गेला त्यामुळे ग्रामस्थांचे मोठे हाल झाले आहेत. हा कॉजवे लवकरच दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
कुडाळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमध्ये नारूर येथील मुख्य रस्ता ते सरनोबतवाडी शाळेकडे जाणारा कॉजवे वाहून गेला आहे. ही एक नंबर शाळा असून या ठिकाणी मतदान केंद्र आहे भविष्यामध्ये सदर मतदान केंद्र आणि त्या ठिकाणी जाणाऱ्या ग्रामस्थांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे हा कॉजवे लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.


