Friday, May 8, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळआमदार निलेश राणे यांच्या मदतीमुळे युवकांच्या गुडघ्याची झाली शस्त्रक्रिया..!आमदार निलेश राणे यांचे...

आमदार निलेश राणे यांच्या मदतीमुळे युवकांच्या गुडघ्याची झाली शस्त्रक्रिया..!आमदार निलेश राणे यांचे युवकाने मानले आभार..!!

कुडाळ | प्रतिनिधी

मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून आमदार निलेश राणे यांनी निखिल मधुसूदन सातार्डेकर या युवकाला शस्त्रक्रियेसाठी निधी मिळवून दिल्याबद्दल निखिल सातार्डेकर या युवकांनी आमदार निलेश राणे यांचे आभार मानले आहेत.

निखिल मधुसूदन सातार्डेकर हा युवक आर्थिक दृष्ट्या अडचणीत होता त्याच्या डाव्या गुडघ्याची शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते मात्र आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे ही शस्त्रक्रिया होत नव्हती. दरम्यान शिवसेनेचे ओरोस विभागाचे प्रमुख दीपक नारकर व बावचे माजी सरपंच नागेश परब यांनी ही बाब आमदार निलेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिली त्यांनी तात्काळ मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून या युवकाला मदत मिळवून दिली याबद्दल निखिल सातार्डेकर यांनी आभार पत्राच्याद्वारे आमदार निलेश राणे यांचे आभार मानले आहेत. या दिलेल्या मदतीमुळे माझ्या पायाची शस्त्रक्रिया वेळेवर झाली आणि मी पुन्हा चालू शकलो असे त्यांनी आभार पत्रात म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!