Friday, December 5, 2025
Google search engine
Homeआपलं कुडाळ*रोगा नुसार योगा या संकल्पनेतून सर्व सामान्य जनतेच जिवन निरोगी व सुखी...

*रोगा नुसार योगा या संकल्पनेतून सर्व सामान्य जनतेच जिवन निरोगी व सुखी बनवीण्याचा प्रयत्न करा – प. पू.श्री गावडे काका महाराज*

कुडाळ | प्रतिनिधी 

जीवनामध्ये योगाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे योगा म्हणजे कसरती नाही, व्यायाम नाही योगा म्हणजे एक तपस्या आहे ज्या तपश्चर्येतून सामाजिक बांधिलकी उभी राहते ज्यातून कौटुंबिक जिव्हाळा निर्माण होतो ज्या संकल्पनेतून आपलं निरोगी आयुष्य निर्माण होत. माणसा माणसातील नाती दृढ होतात. म्हणून या जागतिक दिनाला महत्त्व आहे. आजच्या या धकाधुकीच्या जीवनात आपण पैशाच्या मागे पळतो. काही जण मोह मायेच्या मागे पळतात. जिवनजगण्याचा अर्थ समजावून घ्या. विज्ञानाच्या माध्यमातून आपण पुढे चाललेलो आहोत. मोबाईल व इंटरनेटच्या माध्यमातून आपण जगाशी कनेक्ट होऊ शकतो. एक चांगलं माध्यम विज्ञानाने आपणाला बनवून दिलेल आहे.परंतु या माध्यमाचा आपण अतिरेक करतो आहोत. त्याचा योग्य उपयोग आपण करत नाही आहोत.आज योगाच्या माध्यमातून समाज घडवायचा आहे ऍलोपॅथिक गोळ्या औषधाचा जीवावर जगतो आहोत. सुदृढ व निरोगी जगायचं असेल तर रोगानुसार योगा ही संकल्पना राबविणे गरजेचे आहे.मी दहा वर्षांपूर्वी निर्णय घेतलेला होता की प्रत्येक गावामध्ये दोन योगशिक्षक निर्माण व्हावेत,संस्थेच्या माध्यमातून दहा योगशिक्षक निर्माण करून महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यापीठ योग अभ्यास केंद्र माड्याचीवाडीत निर्माण करून या माध्यमातून अनेक योग्य शिक्षक घडविलेले आहेत. व त्यांना रोजगाराची संधी प्राप्त झालेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या माध्यमातून 300 योगशिक्षक घडवायचे आहे. जे समाजाला योगाचे महत्त्व पटवून देतील व समाजातील लोकांच आरोग्य निरोगी बनवतील. *रोगानुसार योगा ही संकल्पना संस्थेची असून ती तळागळा पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा व लोकांचे जीवन सुखी समृद्धी व निरोगी राहण्यासाठी हातभार लावा .असे श्री श्री 108 महंत मठाधीष प. पू. सदगुरू श्री गावडे काका महराज आपल्या मार्गदर्शनात म्हणाले*.

 जागतीक योग दिनाचे औचीत्य साधून श्री सदगुरू भक्त सेवा न्यास रजी. माड्याचीवाडी कुडाळ या सामाजीक संस्थेच्या माध्यमातून रोगानुसार योगा या कार्यक्षाळेचे दिप प्रज्वलीत करून उदघाटन प. पू. सदगुरू श्री गावडे काका महाराच यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राकेश केसरकर, खजीनदार गौरव मुंज, मुख्य समन्वयक राकेश केसरकर, आंतरराष्ट्रीय योग शिक्षक आनंद सांवत, योग शिक्षक दिलीप सुतार, प्रथमेश परब, ऐश्वर्या गडकरी, गिरीधर गावडे उपस्थित होते. प्रास्तावीक राकेश केसरकर यानी, व सुत्रसंचालन आनंद सावंत यानी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!