Wednesday, August 12, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळफ्लाय९१ आणि सिंधुदुर्ग विमानतळाच्या नि:शुल्क कोच सेवेला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

फ्लाय९१ आणि सिंधुदुर्ग विमानतळाच्या नि:शुल्क कोच सेवेला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

सिंधुदुर्ग | प्रतिनिधी 

फ्लाय९१ आणि सिंधुदुर्ग विमानतळ प्रशासनाने संयुक्तपणे सुरू केलेली चिपी विमानतळ ते पणजी (गोवा) दरम्यानची नि:शुल्क कोच सेवा प्रवाशांसाठी एक मोठा दिलासा ठरत आहे. या सेवेमुळे चिपी विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांना गोव्याच्या मुख्य शहरापर्यंत पोहोचण्यासाठी आता सहज, सोयीस्कर आणि खर्चिक त्रासाशिवाय प्रवास करता येतो. आरामदायी वातानुकूलित बस, ठराविक वेळापत्रक, आणि प्रवाशांच्या गरजांचा विचार करून आखलेला मार्ग यामुळे या सेवेची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. स्थानिक नागरिकांपासून ते पर्यटकांपर्यंत अनेकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून, कोकणातील हवाई सेवा अधिक प्रभावी आणि प्रवासी-केंद्रित होण्याच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. 

ही कोच सेवा फ्लाय९१ची टियर २ आणि टियर ३ शहरांना जपोडण्याची कटिबद्धता दर्शविते. “पूर्वी गोव्यात आल्यानंतर प्रवासात खूप अडचणी यायच्या. एकदा तर बसचा टायर पंक्चर झाल्याने तब्बल तासभर रस्त्यात अडकून राहावं लागलं होतं,” असं पुण्याहून गोव्यात सहलीसाठी आलेल्या सुमी रहमान यांनी सांगितलं. “मात्र फ्लाय९१ आणि सिंधुदुर्ग विमानतळाच्या कोच सेवेने प्रवास केवळ दोन तासांत सुखकर झाला. अनुभव खूपच समाधानकारक होता. काही किरकोळ सुधारणा झाल्यास ही सेवा इतरांनाही नक्की सुचवेन,” असंही त्या म्हणाल्या. 

“फ्लाय९१च्या स्वस्त तिकिटांसोबत विमानतळाची ही कोच सेवा म्हणजे प्रवाशांसाठी एक उत्तम सुविधा आहे. आतापर्यंत कोणत्याही विमान कंपनीने अशी सोय दिली नव्हती. प्रवासदरम्यान काही लहानसहान अडथळे आले खरे, पण एकंदरीत प्रवास हा खूपच आरामदायी, सुरक्षित आणि सुलभ झाला,” प्रवाशी नाझ अहमद यांनी सांगितले.

गोमंतकीय प्रवासी गौतम मोहन राणे यांनी आपले समाधान- व्यक्त करत, “ही सेवा नसती तर आम्हाला महागड्या टॅक्सीचा आधार घ्यावा लागला असता. पण या कोच सेवेने प्रवास केवळ सोपा आणि वेगवानच नाही, तर अगदी त्रासमुक्त झाला. खरोखरच ही सेवा प्रवाशांसाठी फारच उपयुक्त आहे,” असे ते म्हणाले. 

“पूर्वी सिंधुदुर्गहून पणजीला येण्यासाठी प्रवासाचं नीट नियोजन करावं लागायचं, वेळ आणि खर्च दोन्हींची चिंता वाटायची. पण आता या मोफत कोच सेवेमुळे प्रवास खूपच सुलभ आणि सोयीस्कर झाला आहे. मी आधीच माझ्या मित्रमंडळींना ही सुविधा वापरण्याची शिफारस केली आहे,” असे मत ज धनंजय यांचे होते. फ्लाय९१ आणि चिपी विमानतळाची ही नि:शुल्क कोच सेवा प्रवाशांच्या दृष्टीने फारच उपयुक्त ठरत आहे. ही सेवा छोट्या विमानतळांना प्रमुख शहरी केंद्रांशी जोडण्याचं महत्त्वाचं कार्य पार पाडत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!