Thursday, May 7, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळबैलाच्या हल्यात गंभीर दुखापत झालेल्या कुंभारवाडी येथील पुष्पलता रामचंद्र मांजरेकर यांचा दुर्दैवी...

बैलाच्या हल्यात गंभीर दुखापत झालेल्या कुंभारवाडी येथील पुष्पलता रामचंद्र मांजरेकर यांचा दुर्दैवी मृत्यू…

कुडाळ : 

      कुडाळ शहरातील मधली कुंभारवाडी येथील पुष्पलता रामचंद्र मांजरेकर (वय 70) यांना शनिवारी पहाटे त्यांच्याच बैलाने मारल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

     पुष्पलता या बैलाला गवत घालण्यासाठी गेल्या असता, त्यांच्यावर बैलाने हल्ला केला. यात बैलाचे शिंग लागून त्यांना गंभीर दुखापत झाली. लागलीच त्यांना येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र तत्पूर्वीच त्यांचे दुर्देवी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे, असा मोठा परिवार आहे. कुडाळ न.पं.चे नगरसेवक उदय मांजरेकर व टेंपो व्यावसायिक पंढरी उर्फ बंड्या मांजरेकर यांच्या त्या मातोश्री होत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!