Saturday, May 9, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळसिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उभारणार भजन सदन पालकमंत्री नितेश राणे 

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उभारणार भजन सदन पालकमंत्री नितेश राणे 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भजन स्पर्धेचे झाले उद्घाटन

 

कुडाळ | प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रखर हिंदुत्ववादी आहेत आणि त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भजनी कलाकार संस्थेच्या वतीने जी भजन स्पर्धा आयोजित केली आहे ती खरोखरच अभिमानास्पद असल्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगून लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात भजन सदन उभे राहील आणि पुढच्या वर्षाची भजन स्पर्धा ही त्या भवनात होईल असे आश्वासित यावेळी केले.

सिंधुदुर्ग जिल्हा भाजप आणि भजनी कलाकार संस्थेच्या वतीने कुडाळ येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन महालक्ष्मी हॉल येथे करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाले यावी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भजनी कलाकार संस्थेचे जिल्हाध्यक्ष बुवा संतोष कानडे, सुरेश सावंत, कुडाळ तालुका अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, ज्येष्ठ भजनी बुवा श्री परब, मोहन सावंत, ज्येष्ठ भजनी बुवा श्री पारकर आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

या भजन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी नितेश राणे यांनी सांगितले की आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रखर हिंदुत्ववादी आहेत आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही भजन स्पर्धा आयोजित केली हे खरोखरच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे आपल्या भजन संस्कृतीमुळे अजूनही हिंदुत्ववाद टिकून आहे त्यामुळे आपल्या भजन संस्कृतीला राजयोग मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार हे या जिल्ह्यातील आहेत त्यामुळे त्यांना भजन संस्कृती बद्दल माहिती आहे लवकरच भजनी बुवांसाठी राजाश्रय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत त्यांना ज्या पद्धतीचे आमच्याकडून काम अपेक्षित आहे ते आम्ही महायुती म्हणून करून दाखवणार आहोत. भजनाच्या माध्यमातून आपल्या देवदेवतांच्या महतीचा प्रचार आणि प्रसार होत असतो त्यामुळे ही भजन संस्कृती आम्हाला सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे त्यामुळे येत्या काळामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भजन सदन उभारण्यात येईल आणि पुढच्या वर्षीची भजन स्पर्धा ही त्या सदनामध्ये घेण्यात येईल असे पालकमंत्री नितेश राणे यांनी भजनी कलाकारांना आश्वासित केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैभव खानोलकर यांनी केले तर आभार तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!