Saturday, May 9, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडी*राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार यांचा वाढदिवस जिल्हाध्यक्ष...

*राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार यांचा वाढदिवस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या उपस्थितीत कणकवली येथे वृक्षारोपण करून व मुलांना शैक्षणिक साहित्य व अल्पोपाहार देऊन साजरा करण्यात आला*

 

    *महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ना.अजित दादा पवार साहेबांचा 22 जुलै रोजी वाढदिवस सिंधुदुर्ग राष्ट्रवादी पक्षाने प्रत्येक तालुक्यात साजरा करण्याचे जिल्हा कार्यकारिणीच्या सभेत ठरविल्याप्रमाणे कणकवली शाळा नंबर 5येथे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण व शाळेतील मुलांना अल्पोपाहार देऊन सौ. हुमेरा नाईक, सौ. कल्पना मलये,सौ. उज्ज्वला जावडेकर या महिलांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कल्पना मलये यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांनी दिलेल्या सूचनेनुसार आदरणीय अजित दादांचा वाढदिवस पूर्ण राज्यात साजरा होत आहे वाढदिवस हा सामाजिक लोकांशी बांधिलकी ठेऊन लहान मुलापासून जेष्ठ लोकांचा सन्मान करण्यापर्यंत कार्यक्रम आम्ही करत आहोत वृक्षारोपण व वृक्ष वाटप हे कार्यक्रम आम्ही अग्रक्रमाने करत आहोत त्याचबरोबर आदरणीय अजित दादा यांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना केली*

 *त्यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, राष्ट्रवादी कणकवली तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत,राष्ट्रवादी युवक अध्यक्ष निशिकांत कडुलकर, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष इम्रान शेख, सौ.हुमेरा नाईक,मुख्याध्यापिका सौ.कल्पना मलये,सौ. उज्ज्वला जावडेकर, जिल्हा सचिव सतीश पाताडे,शहर उपाध्यक्ष गणेश चौगुले,तालुका उपाध्यक्ष किशोर गावकर, वासिम फकीर,माजी तालुकाध्यक्ष राजेश पाताडे,उदय सावंत,इम्तियाज फकीर,बाळू मेस्त्री,अंकुश मेस्त्री,जहीर फकीर,अंगणवाडी शिक्षिका सौ. स्वाती पोयेकर,सौ. केतकी दळवी,शिक्षका सौ. शर्मिला चव्हाण,सौ. सोनाली जाधव, शिक्षिका सौ. विशाखा धुमाले,सौ.सदिशा शिवगण, सौ. रसिका मिराशी,सुशील शिरसाठ, पाटील*

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!