Friday, May 8, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळकुडाळ बसस्थानकातून ग्रामीण भागात धावणा-या एसटी बस फे-या वारंवार उशिराने सुटत असल्याचा...

कुडाळ बसस्थानकातून ग्रामीण भागात धावणा-या एसटी बस फे-या वारंवार उशिराने सुटत असल्याचा प्रकार वारंवार घडत आहे

कुडाळ : 

     कुडाळ बसस्थानकातून ग्रामीण भागात धावणा-या एसटी बसफे-या वारंवार उशिराने सुटत असल्याचा प्रकार वारंवार घडत आहे. यामुळे शालेय मुलांसह प्रवाशांची अनेकदा गैरसोय होते. गुरूवारी सायंकाळी चार वाजता सुटणारी कुडाळ – सरंबळ बस फेरी पाच वाजले तरी सुटली नाही. त्यामुळे याबाबत त्या प्रवाशासह अन्य प्रवाशांनी बसस्थानकातील कंट्रोल रूमला चौकशी केली असता, एसटी कडून असमाधानकारक उत्तरे प्रवाशांना मिळाली. त्यामुळे त्या संतप्त प्रवाशाने चक्क बसस्थानकातच आंदोलन करण्याचा निर्णय घेत, बसस्थानकात आलेल्या एसटी बसेससमोर उभे राहून, बसेस बसस्थानका बाहेर पडू देणार नाही, अशी भूमिका घेतली. या प्रकारामुळे एसटी प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. कुडाळ पोलीसांना या घटनेची माहीती देण्यात आली. लागतील पोलिस काॅन्स्टेबल सचिन गवस आणि गणेश चव्हाण यांनी बसस्थानकात धाव घेत, आंदोलनकर्त्या त्या ज्येष्ठ नागरिक प्रवाशाला बाजूला घेत त्याची समजूत काढली. अशाप्रकारे सार्वजनिक सेवेत अडथळे निर्माण करणे, योग्य नाही. तर बस लेट असेल तर तुम्ही एसटीकडे कायदेशीर मार्गाने लढू शकता, असे सांगत पोलिसांनी त्या प्रवाशाची समजूत काढत, समज दिली. मात्र या आगाराच्या गोंधळी कारभाराबाबत त्या प्रवाशाने तीव्र नाराजी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!