भव्य रिक्षा रॅलीने करण्यात आले श्रीफळ अर्पण
कुडाळ | प्रतिनिधी
नारळी पौर्णिमेनिमित्त शिवसेनेच्या वतीने काढलेल्या रिक्षा रॅलीने धुरळा उडवला. या रिक्षा रॅलीमध्ये आमदार निलेश राणे सहभागी झाले आणि भंगसाळ नदीमध्ये श्रीफळ अर्पण केले यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक व रिक्षा व्यवसाय यांची गर्दी होती. ही रॅली यशस्वी करण्यासाठी कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे यांनी मेहनत घेतली.
दरवर्षी कुडाळ शहरांमध्ये रिक्षा रॅली काढून नारळी पौर्णिमेला श्रीफळ अर्पण केले जाते यावर्षी शिवसेनेने काढलेली रॅली सर्वांचे लक्ष वेधून गेली. या रॅलीची सुरुवात गांधी चौक या ठिकाणाहून झाले डीजेच्या तालावर शिस्तबद्ध रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये आमदार निलेश राणे सहभागी झाले तसेच जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, अरविंद करलकर, सरचिटणीस दादा साईल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे, ओरोस प्रमुख दीपक नारकर, भाजपा तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, कुडाळ नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक राजीव कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, श्रुती वर्दम, मालवण शहर प्रमुख दीपक पाटकर, युवा उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके, पावशी सरपंच वैशाली पावसकर, राकेश कांदे, चेतन पडते, मंगेश चव्हाण, बाळा पावसकर, देवेंद्र नाईक, प्रसन्ना गंगावणे, नागेश नेमळेकर, चंदन कांबळी आदी उपस्थित होते. ही रॅली भंगसाळ नदीवर गेल्यानंतर आमदार निलेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करण्यात आला. यावेळी रिक्षा व्यवसायिकांच्या वतीने आमदार निलेश राणे यांचा सत्कार करण्यात आला.


