Sunday, May 10, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळनारळी पौर्णिमेनिमित्त शिवसेनेच्या वतीने काढलेल्या रिक्षा रॅलीने धुरळा उडवला...

नारळी पौर्णिमेनिमित्त शिवसेनेच्या वतीने काढलेल्या रिक्षा रॅलीने धुरळा उडवला…

कुडाळ | प्रतिनिधी 

नारळी पौर्णिमेनिमित्त शिवसेनेच्या वतीने काढलेल्या रिक्षा रॅलीने धुरळा उडवला. या रिक्षा रॅलीमध्ये आमदार निलेश राणे सहभागी झाले आणि भंगसाळ नदीमध्ये श्रीफळ अर्पण केले यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक व रिक्षा व्यवसाय यांची गर्दी होती. ही रॅली यशस्वी करण्यासाठी कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे यांनी मेहनत घेतली.

दरवर्षी कुडाळ शहरांमध्ये रिक्षा रॅली काढून नारळी पौर्णिमेला श्रीफळ अर्पण केले जाते यावर्षी शिवसेनेने काढलेली रॅली सर्वांचे लक्ष वेधून गेली. या रॅलीची सुरुवात गांधी चौक या ठिकाणाहून झाले डीजेच्या तालावर शिस्तबद्ध रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये आमदार निलेश राणे सहभागी झाले तसेच जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, अरविंद करलकर, सरचिटणीस दादा साईल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे, ओरोस प्रमुख दीपक नारकर, भाजपा तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, कुडाळ नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक राजीव कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, श्रुती वर्दम, मालवण शहर प्रमुख दीपक पाटकर, युवा उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके, राकेश कांदे, चेतन पडते, मंगेश चव्हाण, बाळा पावसकर, प्रसन्ना गंगावणे, नागेश नेमळेकर चंदन कांबळी आदी उपस्थित होते. ही रॅली भंगसाळ नदीवर गेल्यानंतर आमदार निलेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!