कुडाळ | प्रतिनिधी
विनापरवाना बंदुका तयार करून त्या बाळगल्या प्रकरणी अजून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे यामध्ये मालवण तालुक्यातील हेदुळ येथील अभिषेक घाडी व रत्नागिरी पाली येथील सुरज गावडे याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली या प्रकरणातील अन्य आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली असून आतापर्यंत १२ बंदूका मोटर सायकल कार गाडी पोलिसांनी हस्तगत केली आहे.
विना परवाना बंदुका तयार करून त्या ताब्यात बाळगून अन्य लोकांना विक्री केल्याप्रकरणी माणगाव खोऱ्यातील मोरे येथे छापा टाकल्यानंतर या रॅकेटचा पडदा फार्स झाला होता या प्रकरणात मुंबई पासून ते कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेकांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात नव्याने मालवण तालुक्यातील अभिषेक घाडी याला अटक करण्यात आली त्याच्या ताब्यात दोन बंदुका सापडून आल्या त्या त्याच्या घरातून हस्तगत करण्यात आल्या तर रत्नागिरी जिल्ह्यातील पाली मधील सुरज गावडे याला अटक करून त्याच्या ताब्यात ती कार आणि विशाल आजगावकर यांच्या ताब्यातील मोटरसायकल पोलिसांनी हस्तगत केली आहे या प्रकरणातील अभिषेक घाडी व सुरज गावडे याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली तर अन्य आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे या प्रकरणात अजूनही धागेदोरे सापडण्याची शक्यता पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी वर्तवली आहे.


