Wednesday, August 5, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळपालकमंत्री नितेश राणे यांच्या मटका जुगाराबाबतच्या आक्रमक भूमिकेनंतर कुडाळ पोलीसानीही मटका जुगार,गोवा...

पालकमंत्री नितेश राणे यांच्या मटका जुगाराबाबतच्या आक्रमक भूमिकेनंतर कुडाळ पोलीसानीही मटका जुगार,गोवा बनावटीच्या दारू बाबत कडक भूमिका घेतल्याने तालुक्यातील मटका व्यवसाईकाचे धाबे दणाणले..

कुडाळ : 

           कुडाळ तालुक्यात कुडाळ पोलीसानी एकूण चार ठिकाणी मटका जुगारा व अवैध दारू व्यवसायावर छापा टाकत चार जणांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. 4 हजार 800 रू किमतीची दारू व जुगारावरील छाप्यात 9 हजार 90 रू रोख रक्कम पोलीसानी जप्त केली आहे. कणकवलीतील पालकमंत्री नितेश राणे यांच्या मटका जुगाराबाबतच्या आक्रमक भूमिकेनंतर कुडाळ पोलीसानीही मटका जुगार,गोवा बनावटीच्या दारू बाबत कडक भूमिका घेतल्याने तालुक्यातील मटका व्यवसाईकाचे धाबे दणाणले आहेत.

          कुडाळ पोलिसांनी माणगाव पेडणेकरवाडी तिठा येथे जुगारावर छापा टाकून अंतोन फ्रान्सिस रोड्रिक्स वय 68 वर्ष, राहणार माणगाव मळावाडी ता.कुडाळ याला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई गुरुवारी दुपारी 12.55 वा. केली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार झाराप माणगाव रस्त्यावर पेडणेकरवाडी येथे छापा टाकला. अंतोन फ्रान्सिस रोड्रिक्स वय 68 वर्ष, राहणार माणगाव मळावाडी ता.कुडाळ कल्याण नावाच्या मटका जुगारावर लोकांकडून पैसे स्वीकारून जुगार खेळ खेळवताना आढळला गैर कायदा व बिगर परवाना कल्याण मटका जुगार खेळण्याचे साहित्य व 820 रू रोख रक्कम आपल्या ताबे कब्जात बाळगले स्थितीत मिळून आला. याप्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधि. कलम 12 (a)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेची फिर्याद पोलीस हवालदार आनंद अजून पालन यांनी कुडाळ पोलिसात दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार श्री भोई करत आहेत.पिंगुळी म्हापसेकर तीठा अवि वडापाव सेंटरचे आडोशाला एका ठिकाणी रात्री 8.30 वा. अवैध दारू व्यवसायावर छापा टाकत उत्तम प्रकाश गावडे वय 40 वर्षे राहणार कृष्णनिवास नवीवाडी पिंगुळी ता.कुडाळ याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडून एक पांढऱ्या रंगाची पिशवीत 1 हजार 800 रू किमतीच्या मेकडोल एक च्या 10 बॉटल , बुब्स लेमन व्होडकाच्या 25 बॉटल अशी 4 हजार 800 रू किमतीची दारू जप्त केली. गोवा बनावटीचा प्रोव्हीचा माल गैर कायदा बिगर परवाना आपले ताबे कब्जात बाळगल्या प्रकरणी उत्तम गावडेवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 कलम 65 (ई)प्रमाणेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद पोलीस गणेश चव्हाण यांनी दिली आहे. दरम्यान पोलीसानी झाराप तीठा, मुंबई गोवा हायवे लगत झाराप रेल्वे स्टेशन कडे जाणारे रोडचे बाजूच्या पान टपरीच्या लगत मटका जुगारावर रात्री 8.45 वा छापा टाकला.यावेळी प्रवीण प्रभाकर घाडी वय 42 वर्षे राहणार साळगाव गावठाणवाडी तालुका कुडाळ हा मुंबई मटका जुगाराचे आकड्यावर लोकांकडून पैसे स्वीकारून मटका जुगार खेळ खेळवीत असताना मिळाला. यावेळी त्याच्याकडील 4 हजार 560 रू् रोख रक्कम पोलीसानी जप्त केली. याप्रकरणी त्याला ताब्यात घेत महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधि. कलम 12 (a)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथून 4560 रू रोख रक्कम पोलीसानी जप्त केली. या घटनेची फिर्याद पोलीस सागर महादेव देवार्डेकर यांनी कुडाळ पोलीसात दिली आहे. यानतर 22 ऑगस्ट रोजी पोलीसानी रात्री 1 वा. हॉटेल गुलमोहर च्या समोर स्वामी समर्थ जनरल स्टोअरच्या नजीक मटका जुगारावर 8.20 वा छापा टाकला. यात नरेश मोहन सरमळकर, वय 42 वर्षे, राहणार सरांबळ तळेकरवाडी, तालुका कुडाळ याने लक्ष्मण अनंत खोचरे, वय 40 वर्षे, राहणार हळदीचे नेरूळ तालुका कुडाळ याच्या सांगण्यावरून आरोपीत गैर कायदा बिगर परवाना लोकांकडून पैसे स्वीकारून मुंबई मटका जुगार खेळ खेळताना मिळाला. येथून 3 हजार 710 रू रोख रक्कम जप्त करण्यात आली.याप्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधि. कलम 12 (a), भारतीय न्याय संहिता कलम 49 प्रमाणे दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद स्वप्निल जगन्नाथ चव्हाण यांनी कुडाळ पोलीसात दिली आहे अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!