*मनसेच्या वतीने कुडाळ येथे आजपासून ‘ना नफा, ना तोटा’ तत्वावर फळ विक्री*
कुडाळ
परप्रांतीय, तसेच विशिष्ठ धर्माच्या व्यापार्यांकडून होणारी लूट थांबवण्यासाठी यावर्षी श्री गणेश चतुर्थीनिमित्त सर्व भाविकांसाठी ‘ना नफा, ना तोटा’ तत्वावर फळ विक्री करण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसेने) घेतला आहे. याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मनसे राज्य परिवहन कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष जगन्नाथ उर्फ उपाख्य बनी नाडकर्णी यांनी केले आहे.
सध्या परप्रांतीय व्यापारी, तसेच एक विशिष्ट समाज या व्यवसायावर स्वत:चे वर्चस्व गाजवत आहे. या व्यापार्यांनी सर्व प्रकारची फळे आणि भाज्या यांचे दर मनाला येतील तसे अवाच्या सव्वा वाढवले आहेत. भरमसाठ किमतीने सर्व फळे विकून लाभ कमावत आहे. त्यामुळे गोरगरीब जनतेला लाडक्या गणेशबाप्पाचा सण साजरा करणे कठीण झाले आहे. अशा स्थितीमध्ये मनमानी करणार्या व्यापार्यांना आळा घालण्यासाठी आणि आपल्या गोरगरीब जनतेला गणेशोत्सव सण चांगल्या पद्धतीने साजरा करता यावा, यासाठी मनसेने एक छोटे पाऊल उचलले आहे. फळ विक्रीचा स्टॉल कुडाळ शहरातील राजमाता जिजामाता चौक येथे असणार आहे. अधिक माहितीसाठी ८४३२२२९७९८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन नाडकर्णी यांनी केले आहे.


