Saturday, November 8, 2025
Google search engine
Homeताज्या घडामोडी"पवनार ते पत्रादेवी" अखेरशक्तीपीठ महामार्गास मान्यता … भुसंपादनला प्रशासकिय मान्यता...

“पवनार ते पत्रादेवी” अखेरशक्तीपीठ महामार्गास मान्यता … भुसंपादनला प्रशासकिय मान्यता…

*सावंतवाडी, 28*

*पवनार, जि. वर्धा ते पत्रादेवी, जि. सिंधुदुर्ग या महाराष्ट्र गोवा शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गाचे (महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग) प्रकल्प हाती घेण्यास मान्यता, आखणीस मान्यता व भूसंपादनाकरीता प्रशासकीय मान्यता*

 

*२४.०६.२०२५ रोजीच्या मा. मंत्रीमंडळ बैठकीतील निर्णय*

*महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सिंधदुर्ग या १२ जिल्ह्यातून, ३९ तालुका व ३७० गावातून जाणारा रस्ता आहे. सदर द्रुतगती महामार्गामुळे महाराष्ट्रातील प्रमुख शक्तीपीठे तुळजापूर, कोल्हापूर, माहूर यांचे सह १८ धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत. सदर महामार्गामुळे नागपूर ते गोवा हा सद्यःस्थितीतील १८ तासांचा प्रवास साधारणतः ८ तासावर येणे अपेक्षित आहे*.

 

*पवनार, जि. वर्धा ते पत्रादेवी, जि. सिंधुदुर्ग या महाराष्ट्र गोवा शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गाचे (महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग) प्रकल्प हाती घेण्यास मान्यता, आखणीस मान्यता व भूसंपादनाकरीता प्रशासकीय मान्यता देण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याअनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.*

 

शासन निर्णय :-

*१. पवनार, जि. वर्धा ते पत्रादेवी, जि. सिंधुदुर्ग या महाराष्ट्र गोवा सरहद्द शिघ्रसंचार द्रुतगती महामागांचे (महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग) अंदाजित लांबी ८०२.५९२ कि.मी. हा प्रकल्प महामंडळामार्फत हाती घेण्यास मान्यता देण्यात येत आहे*.

*२. पवनार, जि. वर्धा ते पत्रादेवी, जि. सिंधुदुर्ग या महाराष्ट्र गोवा सरहद्द शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गाचे (महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग) ८०२.५९२ कि.मी. लांबीच्या रस्त्याच्या आखणीस दि.०७.०२.२०२४ च्या शासन निर्णयान्वये मान्यता प्रदान करण्यात आली आहे. सदर आखणीपैकी पवनार ते सांगली या आखणीस मान्यता देण्यात येत आहे*.

३. *मूळ मंजूर आखणीपैकी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भूदरगड, आजरा तालुक्यातील आखणीच्या महाराष्ट्र महामार्ग अधिनियम १९५५ च्या कलम ३ व कलम १५ (२) ची अधिसूचना दि.१५.१०.२०२४ रोजीच्या अधिसूचनेन्वये रद्द करण्यात आली आहे*.

*तद्अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भूदरगड, आजरा तालुक्यातील आखणीचे सर्व उपलब्ध व संभाव्य पर्याय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने तपासून शासनास सादर करावे*

*सदर पर्यायाबाबत जिल्ह्यातील मा. मंत्री व मा. लोकप्रतिनधी यांचेशी चर्चा करून आखणीचा पर्याय अंतिम करण्याकरीता मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री (नगर विकास, गृहनिर्माण, सा.बां. (सा.उ.)) व मा.उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क) यांना अधिकार प्रदान करण्यास मान्यता देण्यात येत आहे*.

 

*४. पवनार, जि. वर्धा ते पत्रादेवी, जि. सिंधुदुर्ग या महाराष्ट्र गोवा सरहद्द शिघ्रसंचार द्रुतगती महामार्ग (महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग) या प्रकल्पाकरीता भूसंपादनाची कार्यवाही तात्काळ हाती घेण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर प्रकल्पाकरीता रक्कम रु.१२,००० कोटी (Principal) व संभाव्य व्याज रु.८,७८७ कोटी (Interest) असे एकूण रु.२०,७८७ कोटी इतक्या रक्कमेस प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे*.

 

५. सदर प्रकल्पाकरीता प्रशासकीय मान्यता, वित्तीय नियोजन व वित्तीय आराखडा, प्रारुप निविदा प्रपत्रे, सवलत करारनाम्याचा मसुदा यास महामंडळाकडून सविस्तर प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर मा. मंत्रिमंडळाच्या पूर्व मान्यतेनंतर महामंडळामार्फत सा.बां. विभागाच्या प्रचलित पध्दतीप्रमाणे निविदा प्रक्रिया हाती घेणे अनिवार्य राहील.

 

६. वित्त विभागाने सूचित केल्याप्रमाणे व वित्त विभागाच्या सहमतीने हुडकोला आवश्यक असलेल्या अटी “Government of Maharashtra will make good of shortfall / deficit if any in the Revenue Stream of MSRDC for the subject mentioned scheme from the State funds for making timely repayment of HUDCO loan installments as per the terms of the Loan Agreement during currency of HUDCO loan” हुडकोच्या Comfort Letter मध्ये समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!