कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ येथील सिंधुदुर्ग राजाचे दर्शन आमदार निलेश राणे यांनी घेतले त्यांच्या हस्ते गणरायाची आरती संपन्न झाली यावेळी आमदार निलेश राणे यांनी सांगितले की गणरायाने आम्हा राणे कुटुंबीयांवर भरभरून आशीर्वाद दिले आहेत त्यांचे हे आशीर्वाद सदैव आमच्या व आमच्या कार्यकर्त्यांवर आबाजीत राहावेत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची जनता सुखी समाधानी राहावी असे साकडे त्यांनी गणरायासमोर घातले.
सिंधुदुर्ग राजाचे दर्शन आमदार निलेश राणे यांनी घेतले यावी त्यांनी गणरायाची पूजा केली तसेच गणरायाची आरती ही केली यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, अरविंद करलकर, ओंकार तेली, युवा सेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, कुडाळ तालुका प्रमुख विनायक राणे, दीपक नारकर, रचना नेरुरकर, कुडाळ नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, कुडाळ शहर प्रमुख अभी गावडे, गटनेता विलास कुडाळकर, कुडाळ महिला शहर प्रमुख श्रुती वर्दम, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, तालुका सरचिटणीस राकेश कांदे, युवा शहर प्रमुख आबा धडाम, चेतन पडते, रेवती राणे, राकेश नेमळेकर, नागेश नेमळेकर, मालवण शहर प्रमुख दीपक पाटकर, युवा सेनेचे तेंडोलकर, चंदन कांबळी, प्रथमेश कांबळी, प्रसन्ना गंगावणे, आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीने आमदार निलेश राणे यांना मंत्रीपद मिळावे म्हणून साकडे घालण्यात आले त्यानंतर आमदार निलेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की गणरायाने आम्हा राणे कुटुंबीयांवर सतत आशीर्वाद ठेवले आहेत. गणराय जिल्ह्यातील सर्व जनतेला सुखी समाधानी ठेव असे साकडे सुद्धा त्यांनी यावेळी घातले.


