Friday, December 5, 2025
Google search engine
Homeआपलं कुडाळकुडाळ तालुक्यातील पांग्रड येथील वरची कुंभ्याची वाडी रस्ता वाहून गेला; नागरिकांची गैरसोय...

कुडाळ तालुक्यातील पांग्रड येथील वरची कुंभ्याची वाडी रस्ता वाहून गेला; नागरिकांची गैरसोय तातडीने संरक्षक भिंत बांधण्याची मागणी

कुडाळ | प्रतिनिधी 

 

कुडाळ तालुक्यातील पांग्रड गावातील वरची कुंभाचीवाडी येथून ऐतिहासिक रांगणागडाकडे जाणारा रस्ता अतिवृष्टीमुळे वाहून गेला असून सुमारे वीस कुटुंबांसह शालेय विद्यार्थी, आजारी व्यक्ती तसेच पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. सदर रस्ता धोकादायक अवस्थेत असून तातडीने संरक्षक भिंत बांधून रस्ता पूर्ववत करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

 

सन 2015 मध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्याला संरक्षक भिंत मंजूर झाली होती. मात्र, तत्कालीन आमदार व निष्क्रिय प्रशासनामुळे अवघ्या तीन महिन्यातच ती भिंत कोसळली. त्यामुळे या बांधकामाचा दर्जा व निधीच्या वापराबाबत शंका निर्माण झाली असून त्याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

 

दरम्यान, प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन रस्ता दुरुस्त करून सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थ व पर्यटकांनी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!