Monday, June 22, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळसिंधुदुर्ग राजाच्या दरबारात उद्या देवगड येथील दिंडी भजन व स्वरगंधार कार्यक्रम 

सिंधुदुर्ग राजाच्या दरबारात उद्या देवगड येथील दिंडी भजन व स्वरगंधार कार्यक्रम 

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून नगरसेवकांच्यावतीने होणार कार्यक्रम 

 

कुडाळ | प्रतिनिधी

सिंधुदुर्ग राजाच्या दरबारामध्ये उद्या गुरुवार ११ सप्टेंबर रोजी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून नगरसेवकांच्यावतीने देवगड इळये येथील ६० कलावंतांच्या संचात आई महालक्ष्मी प्रसादिक वारकरी दिंडी भजन व कुडाळ येथील स्वरगंधार हे कार्यक्रम सादर होणार आहे.

सिंधुदुर्ग राजाच्या दरबारामध्ये नगरसेवकांच्या वतीने उद्या गुरुवारी ११ सप्टेंबर रोजी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत या कार्यक्रमांमध्ये सायं. ४ वाजता कुडाळ येथील स्वरगंधार हे भक्ती गीतांचा कार्यक्रम तर सायं. ६ वा. देवगड येथील आई महालक्ष्मी प्रसादिक वारकरी दिंडी भजन मंडळाचा दिंडी व भजनाचा कार्यक्रम होणार आहे तरी या कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर व गटनेता विलास कुडाळकर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!