Thursday, May 7, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीयेत्या 4 ते 8 ऑक्टोबर दरम्यान नितेश राणे 'स्वीडन'च्या अभ्यास दौऱ्यावर...!

येत्या 4 ते 8 ऑक्टोबर दरम्यान नितेश राणे ‘स्वीडन’च्या अभ्यास दौऱ्यावर…!

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी )

 

राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री व सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे येत्या 4 ते 8 ऑक्टोबर दरम्यान स्वीडनच्या (स्टॉक होम )दौऱ्यावर जाणार आहेत.

            स्टॉकहोम इथली कँडेला टेकनॉलॉजी(एबी)ही जगप्रसिद्ध कंपनी,अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे ‘इलेक्ट्रिक हायड्रोफाईल बोटी’ तयार करत असून त्याची पहाणी व या बोटींच्या वापरासंबंधी कंपनीच्या तज्ञांशी राणे हे चर्चा करणार आहेत.

             या बोटी पर्यावरणपूरक, अत्याधुनिक, स्वस्त व किफायतशीर तसेच दीर्घकालीन सागरी व जल वहातुकीसाठी उपयुक्त असल्याने या बोटींचा राज्यातील सागरी किनाऱ्यांवर वापर करण्याच्या दृष्टीने कंपनीच्या तज्ञांशी चर्चा व विचारविनिमय करण्यात येणार असून त्यादृष्टीने कंपनीशी सामंजस्य करार केला जाण्याचीही शक्यता आहे.

               या दौऱ्यात राणे यांच्या सोबत विभागाचे तीन वरिष्ठ अधिकारीही असणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!