Monday, June 22, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीतेर्सेबाबर्डे मळावाडी ते मांडकुली भोईवाडी पर्यंत जाणारा रस्ता ही कामे लवकरच मार्गी...

तेर्सेबाबर्डे मळावाडी ते मांडकुली भोईवाडी पर्यंत जाणारा रस्ता ही कामे लवकरच मार्गी लागतील : आमदार निलेश राणे

कुडाळ | प्रतिनिधी 

तेर्सेबाबर्डे मळावाडी ते मांडकुली भोईवाडी पर्यंत जाणारा रस्ता करावा तसेच ब्रिजसाठी आवश्यक असणारा निधी मिळावा असे निवेदन मांडकुली सह भोयाचे केरवडे, मुळदे येथील ग्रामस्थांनी आमदार निलेश राणे यांना दिले. ही कामे लवकरच मार्गी लागतील असे आमदार निलेश राणे यांनी ग्रामस्थांना सांगितले. 

 या निवेदनात पंचक्रोशीतील मांडकुली केरवडे, तुळसुली, मुळदे या गावांना जोडणाऱ्या तेर्सेबांबर्डे मळावाडी ते माडकुली भोईवाडी दरम्यान कर्ली नदीवर मोठ्या ब्रिजची अनेक वर्षापासून मागणी होत होती शासन दरबारी केलेल्या सतत पाठपुराव्यामुळे या मार्गावर ब्रिज पूर्ण होऊन तीन वर्ष पूर्ण झालेली आहेत परंतु तेर्से बांबर्डे राष्ट्रीय महामार्ग ते कर्ली नदीपर्यंत जाणाऱ्या अंदाजे १५० मीटर लांबीच्या रस्त्याची नोंद तेर्से बाबर्डे ग्रामपंचायतीने अद्याप लावलेली नाही त्यामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांची दळणवळणाचा प्रश्न गहण बनला आहे तरी हा रस्ता आणि ब्रिजचे काही ठराविक असलेले काम पूर्ण झाल्यास ग्रामस्थांचा दळणवळणाचा प्रश्न सुटणार आहे असे निवेदन आमदार निलेश राणे यांना ग्रामस्थांनी दिले आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद धोंड, प्रशांत धोंड, परशुराम नार्वेकर, बाबाजी भोई, शैलेंद्र न्हावेलकर, मोहन भोई आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!