Sunday, June 21, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळमोक्का न लावण्यासाठी दहा लाख रु मागितले, एकाला अटक, तीन दिवस पोलीस...

मोक्का न लावण्यासाठी दहा लाख रु मागितले, एकाला अटक, तीन दिवस पोलीस कोठडी…

⭕ मुख्य संशयितांने काढली पळ, एक लाख रु.स्वीकारले.     

⭕ कुडाळ पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल.    

⭕ सिद्धीविनायक बिडवलकर खून प्रकरण

     

कुडाळ | प्रतिनिधी 

              

कुडाळ तालुक्यातील चेंदवण येथील सिद्धीविनायक बिडवलकर खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी सिद्धेश अशोक शिरसाट याला मोक्का न लावण्यासाठी तसेच त्याला जामीन करण्यासाठी दहा लाख रु.ची खंडणी मागितली.तसेच त्यापैकी अडव्हान्स म्हणून 1 लाख रु स्वीकारल्या प्रकरणी अँड किशोर वरक ( रा.खानोली, ता. वेंगुर्ले व सुरेश दुर्गा झोरे ( 38,रा. हिर्लोक, ता. कुडाळ ) या दोघांवर कुडाळ पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल केला.यातील सुरेश झोरे याला ताब्यात घेत अटक केली असून त्याला कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 18 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र यातील मुख्य संशयित अड. किशोर वरक हा या तक्रारीनंतर गायब झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याबाबतची फिर्याद सिद्धी सिद्धेश शिरसाट ( कुडाळ – बाजारपेठ ) यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. खंडणीची ही घटना जुलै महिन्याचा पहिला आठवडा ते 15 जुलै 2025 या कालावधीत घडली आहे.     

         कुडाळ पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार , एप्रिल 2025 चे पहिल्या आठवडयात सिद्धी शिरसाट व त्यांचा पती सिद्धेश शिरसाट 

घरी असताना पावशी येथील योगेश तुळसकर त्याच्या घरी आले. हिर्लोक येथील सुरेश झोरे याचा फोन होता. त्याने चेंदवण येथील सिद्धीविनायक बिडवलकर हा बेपत्ता झाल्या बाबतच्या तक्रारीमध्ये सिद्धेश शिरसाट याचा हात असून याबाबत अॅड किशोर वरक हे सिद्धेश शिरसाट याच्या विरुद्ध तक्रार करणार आहेत. त्यात सिद्धेश याला त्रास होणार असल्याने तक्रार करायची नसल्यास वरक याला भेटून प्रकरण मिटवा निरोप असा वरक याने दिला आहे , असे झोरे याने सांगितले. त्यानंतर सिद्धीविनायक बिडवलकर यांच्या खून प्रकरणी निवती पोलीस ठाण्यात सिद्धेश याच्यावर गुन्हा दाखल केला. सिद्धेश व त्याच्या कामगारांना अटक झाली होती. सिद्धेश तुरुंगात असताना जुलै 2025 मध्ये योगेश तुळसकर यांनी सिद्धी यांना फोन करून पती सिद्धेश शिरसाट याच्या विरुद्ध अॅड वरक सरकारी वकीलांसोबत न्यायालयात काम करणार आहे. तसेच सिद्धेश याच्यावर मोक्का लावणार आहेत. त्यामुळे त्याचा जामीन होणार नाही, असे सांगुन मोक्का लावायचा नसल्यास 10 लाख रु. द्यावे लागतील, असा निरोप वरक याचा माणुस सुरेश झोरे याने फोनव्दारे सांगितला असल्याचे सांगितले. वरक याची भेट घेण्यासाठी ओरोस येथील सिद्धेश याचा मित्र हार्दीक शेगले यांना याबाबत सांगितले. त्यानंतर तुळसकर व शेगले यांनी वरक व झोरे या दोघांची 3 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5 .45 ते 7 वाजण्याच्या मुदतीत कुडाळ – एमआयडीसी येथे भेट घेतली. तेव्हा वरक याने सिद्धेश आला मोक्का लावायचा नसल्यास 10 लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. मोक्का न लावण्यासाठी तसेच जामीन लवकर मिळावा यासाठी 10 लाख रु.ची मागणी केली. तसेच अॅडव्हान्स म्हणून पाच लाख रु.ची मागणी केली अडीज लाख अॅडव्हान्स देणार असल्याचे सांगितले होते. परंतु सिद्धेश याचा जामीन मंजुर झाल्याने सिद्धी यांनी वरक याला त्याने मागणी केलेले पैसे दिले नाहीत. परंतु शेगले व तुळसकर यांनी एक लाख ॲडव्हान्स म्हणून वरक याला 3 जुलै रोजी दिल्याचे श्री शेगले यांनी सिध्दी शिरसाट यांना सांगितले. दरम्यान , संशयित किशोर वरक व सुरेश गोरे या दोघांवर खंडणी मागितली व ती घेतल्याप्रकरणी भारतीय न्याय सहिता 308 (2), 308 (3),308 (7), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल केला.या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!