Sunday, June 21, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळबाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधकाम योजनेतून कुडाळ तालुक्यातील ३ तर मालवण...

बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधकाम योजनेतून कुडाळ तालुक्यातील ३ तर मालवण तालुक्यात २ ग्रामपंचायत बांधकामांना मंजुरी.

*आमदार निलेश राणे यांचे जांभवडे, आंबडपाल, वेरळ, कसाल, कातवड सरपंचांनी व्यक्त केले आभार.* 

 

कुडाळ | प्रतिनिधी 

 

बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधकाम योजनेतून कुडाळ तालुक्यातील ३ तर मालवण तालुक्यात २ ग्रामपंचायत बांधकामांसाठी एकूण १ कोटी १० लक्ष एवढ्या निधीला मंजुरी मिळाली असून यात कुडाळ तालुक्यातील जांभवडे ग्रामपंचायत इमारत बांधकाम करणे २५ लक्ष, कसाल ग्रामपंचायत इमारत बांधकाम करणे २५ लक्ष, आंबडपाल ग्रामपंचायत इमारत बांधकाम करणे २० लक्ष तर मालवण तालुक्यातील वेरळ ग्रामपंचायत इमारत बांधकाम करणे २० लक्ष व कातवड ग्रामपंचायत इमारत बांधकाम करणे २० लक्ष या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. 

आपल्या मागणीनुसार ग्रामपंचायत इमारत बांधकामसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कसाल सरपंच राजन परब, जांभवडे सरपंच अमित मडव, आंबडपाल सरपंच महेश मेस्त्री, वेरळ सरपंच धनंजय परब, कातवड सरपंच प्रतीक्षा हळदणकर यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खासदार नारायणराव राणे, आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे आभार व्यक्त केले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!