Friday, May 8, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळकुडाळ एमआयडीसी येथील रेल्वे ब्रीज नजिकच्या स्पीड ब्रेकवर दुचाकी आदळून अपघात...

कुडाळ एमआयडीसी येथील रेल्वे ब्रीज नजिकच्या स्पीड ब्रेकवर दुचाकी आदळून अपघात…

कुडाळ | प्रतिनिधी 

         कुडाळ एमआयडीसी येथील रेल्वे ब्रीज नजिकच्या स्पीड ब्रेकवर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात कुडाळ एसटी आगारातील सहाय्यक वाहतूक निरिक्षक निलेश दत्ताराम वारंग (वय 41, रा. वाफोली टेंबवाडी-बांदा, सध्या रा.सावंतवाडी खासकीलवाडा) यांचे निधन झाले. हा अपघात रविवारी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास झाला. 

     वारंग हे एमआयडीसी मार्गे सावंतवाडीला जात होते. एमआयडीसी रेल्वे ब्रीज येथे आले असता तेथील स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने त्यावर त्यांची दुचाकी आदळून ते रस्त्यावर पडले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन जखमी झाले. लागलीच स्थानिक नागरिकांनी त्यांना येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी येथीलच एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले. अपघाताची माहीती मिळताच कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याबाबतची खबर तुकाराम हरिश्चंद्र चव्हाण (रा.एमआयडीसी, कुडाळ) यांनी कुडाळ पोलिसात दिली आहे. वारंग यांनी यापूर्वी कणकवली, वेंगुर्ले, सावंतवाडी व बांदा एसटी डेपोत सेवा केली आहे. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुली, आई वडील, भाऊ वहिनी असा परिवार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!