कुडाळ | प्रतिनिधी
पिंगुळी येथे महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावून पाळणाऱ्या बेळगाव येथील दोघांना ग्रामस्थांनी पकडले त्यांना चोप दिला या प्रकरणी बेळगाव येथील शिवनाथ रानबा रेडेकर (वय 43) व विनायक शंकर प्रधान (वय 43) यांच्याविरुद्ध कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंगळी भूपकरवाडी येथील सुनंदा सुरेश पांचाळ या भूपकरवाडी येथील महापुरुष मंदिर येथे वाडीतील लोकांनी ठेवलेल्या देवाच्या प्रसादासाठी गेल्या होत्या. देवाचा प्रसाद घेऊन त्या घरी परतत असताना
त्यांना शितल मोहिते यांच्या घरासमोर स्प्लेंडर क्रमांक (एमएच-०७- ईटी- ९२०२) चालवीत असणारा शिवनाथ रानबा रेडेकर व त्या मोटर सायकलच्या पाठीमागे बसलेले विनायक शंकर प्रधान हे मोटरसायकल घेऊन आले. आणि त्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सुनंदा पांचाळ यांच्या गळ्यातील सुमारे २० हजार रुपये किंमतीचे गंठण हिसका मारून जबरदस्तीने तोडून घेतले. अर्धे गंठण हे पांचाळ यांच्या गळ्यात राहिले. ही घटना पाहिल्यावर शितल मोहिते या घराच्या बाहेर आल्या व त्या धावत आरडा ओरड केला तसेच सुनंदा पांचाळ यांनी सुद्धा आरडाओरड केला हे दोघेही मोटरसायकल घेऊन मंदिराच्या दिशेने गेले त्यावेळी त्या ठिकाणी असलेले सुशांत पाटकर, संकेत पाटकर, अक्षय पाटकर व त्यांचे मित्र मोटरसायकल घेऊन त्या दोघांच्या मागावर गेले दरम्यान या चोरट्यांची गाडी रस्त्यावर घसरून पडली त्याबरोबर शिवनाथ रानबा रेडकर हा ग्रामस्थांच्या हाती लागला तर विनायक प्रधान यांनी पळ काढला. पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तसेच मोटरसायकल व सुमारे २० हजार रुपये किमतीचे गंठण ताब्यात घेतले आहे.


