Friday, May 8, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळकुडाळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल..

कुडाळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल..

कुडाळ | प्रतिनिधी 

कुडाळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या ९ जागांसाठी ४८ उमेदवारी अर्ज तर पंचायत समितीच्या १८ जागांसाठी ६४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये भाजप, शिवसेना, उबाठा शिवसेना, काँग्रेस, शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी, मनसे आणि अपक्षांचा समावेश आहे तसेच भाजप व शिवसेना पक्षांमध्ये बंडखोरीचे ग्रहण लागले असून ही बंडखोरी रोखण्याचे आव्हान पक्षश्रेष्ठीं समोर उभे राहिले आहे आज (बुधवारी) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी कुडाळ तहसील कार्यालय येथे गर्दी उसळली होती.

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कुडाळ तहसील कार्यालय येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांची गर्दी झाली होती या निवडणुकीमध्ये भाजप व शिवसेना महायुती तर उबाठा व काँग्रेस महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे त्याचबरोबर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी, मनसे आणि अपक्षांमध्ये लढत होणार आहे या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषद व पंचायत समिती साठी एकूण ११२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. 

 

भाजप पक्षाकडून दाखल झालेल्या उमेदवारी अर्ज 

भाजप पक्षामधून जिल्हा परिषदेसाठी तेंडोली आरती हरिश्चंद्र पाटील, पिंगुळी अजय आकेरकर, ओरोस सुप्रिया वालावलकर, पंचायत समितीसाठी नेरूर देऊळवाडा ममता देसाई, तेंडोली मंगेश प्रभू, पिंगुळी साधना माडये, घावनळे अर्चना घावनळकर, झाराप सिताराम तेली, आंब्रड नितीन म्हाडेश्वर, आवळेगाव श्रावणी तेरसे, विराणी तेरसे, ओरोस अमित भोगले, पावशी करुणा पावसकर, रितीशा जाधव यांचा समावेश आहे. 

 

शिवसेना पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल 

जिल्हा परिषदेसाठी आंब्रड दीपलक्ष्मी पडते, वेताळ बांबर्डे नागेश आईर, पावशी तुकाराम उर्फ दादा साईल, घावनळे केशव उर्फ दीपक नारकर, माणगाव रुपेश कानडे, नेरूर संजय पडते, पंचायत समितीसाठी माणगाव कौशल्य जोशी, गोठोस दिव्यांनी खरात, वेताळ बांबर्डे सर्वसाधारण अश्विनी सावंत, डिगस निखिल कांदळगावकर, जांभवडे बाळकृष्ण मडव, कसाल बापू पाताडे, नेरुर उत्तर नीता नाईक, पाट सौ. प्रियांका जळवी, साळगाव मिलिंद नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. 

 

उबाठा शिवसेना पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल 

जिल्हा परिषदेसाठी आंब्रड शेजल परब, सोनाली सावंत, वेताळ बांबर्डे बाजीराव झेंडे, ओरोस बुद्रुक जान्हवी सावंत, पावशी अमरसेग सावंत, नेरुर देऊळवाडा विजय लाड, तेंडोली अरुणा राऊळ, सुजाता गावडे, पिंगुळी गंगाराम सडवेलकर, कल्पेश म्हापसेकर, घावनळे सखाराम खोचरे, माणगाव रमाकांत ताम्हणेकर तर पंचायत समितीसाठी आंब्रड दशरथ मेस्त्री, जांभवडे यशपाल सावंत, आवळेगाव योगिता पवार, वेताळ बांबर्डे समृद्धी कदम, स्नेहा दळवी, ओरोस बुद्रुक महादेव परब, रवींद्र परब, कसाल संतोष कांदळकर, कृष्णा आंबेरकर, डिगस नारायण मांजरेकर, पावशी चित्रा पावसकर, नेरूर देऊळवाडा उत्तर भाग दीप्ती नाईक, नेरूर देऊळवाडा दक्षिण भाग अर्चना बंगे, पाट प्राची कुंभार, पिंगुळी ममता राऊळ, साळगाव कृष्णा धुरी, घावनळे सोनिया मुंज, गोठोस दीक्षा तवटे, माणगाव योगेश धुरी, एकनाथ धुरी, झाराप यज्ञेश गोडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

 

वंचित बहुजन आघाडी पक्षाने दाखल केले उमेदवारी अर्ज 

वंचित बहुजन आघाडी पक्षाने जिल्हा परिषदेच्या दोन जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत यामध्ये पावशी भिकाजी जाधव पिंगुळी अंकुश जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. तसेच मनसेने जिल्हा परिषदेसाठी तर काँग्रेस व शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाने पंचायत समिती साठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत यामध्ये मनसे पक्षाकडून पिंगुळी जिल्हा परिषदेसाठी गजानन राऊळ, तर पंचायत समितीसाठी तेंडोलीसाठी काँग्रेस पक्षाकडून विजय प्रभू, साळगावसाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाकडून प्रतीक सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.

 

अपक्षाने दाखल केले उमेदवारी अर्ज 

जिल्हा परिषदेसाठी वेताळ बांबर्डे प्रवीण मर्गज, किर्तीकुमार तेरसे, प्रदीप गावडे, महेश पारकर, महादेव सावंत, ओरोस बुद्रुक प्रीती देसाई, पावशी भानुदास रावराणे, तानाजी पालव, दयानंद अणावकर, रामदास ठाकूर, सिद्धेश परब, भिकाजी कोरगावकर, नेरुर देऊळवाडा रुपेश पावसकर, मंगेश बांदेकर, तेंडोली वर्षा कुडाळकर, पिंगुळी समीर दळवी, प्रसाद दळवी, मयूर परब, रुपेश धुरी, कल्पेश मसके, वर्षा कुडाळकर, घावनळे आनंद मेस्त्री, माणगाव दीपक काणेकर, प्रसाद नार्वेकर, पंचायत समितीसाठी आंब्रड अक्षय लाड, राजेंद्र भोगटे, जांभवडे धोंडी मडवळ, सुभाष मडव, आवळेगाव कुमुदिनी सावंत, वेताळ बांबर्डे सोस्मिता बांबर्डेकर, प्राची परब, ओरोस बुद्रुक मयुरेश राणे, योगेश तावडे, कसाल यशवंत परब, डिगस बुद्धनाथ गोसावी, नेरूर देऊळवाडा उत्तर भाग अस्मिता नाईक, नेरूर देऊळवाडा दक्षिण भाग ऋतुजा खडपकर, तेंडोली निखिल ओरोसकर, पिंगुळी कश्मिरा शिरोडकर, देवयानी धुरी, साळगाव राजेंद्र धुरी, घावनाळे संजना म्हाडगुत, माणगाव रत्नाकर जोशी, प्रज्ञेश धुरी, झाराप अच्युत तेंडोलकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!